स्टोरी

टी-२० क्रिकेट विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघाचा स्वागत सोहळ्यामुळे मुबंई महानगरपालिका हैराण.

Spread the love

मुबंई: टी-२० क्रिकेट विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघाचा स्वागत सोहळा मरिन ड्राईव्ह परिसरात ४ जुलैला पार पडला. या वेळी लाखो मुंबईकर तेथे जमले होते. या सर्वांनी खाद्यपदार्थांची वेष्टने, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, बूट, चपला आणि इतर वस्तू तेथेच टाकल्याने रस्त्यावर पुष्कळ कचरा साठला होता. हा कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेला २ मोठे डंपर आणि ५ लहान जीप यांचा वापर करावा लागला. रात्री ११.३० वाजल्यापासून चालू झालेली ही स्वच्छता मोहीम ५ जुलैला सकाळी ८ वाजेपर्यंत चालूच होती. यात १०० हून अधिक कामगारांना श्रम करावे लागले.


Spread the love

Related posts

निवृत्ती वेतन, नियुक्ती मानधन घेणारे निवृत्ती वेतन धारक तुपाशी तर सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी मात्र उपाशी

news

मंत्री विजयकुमार गावित यांना महिला आयोगाची नोटीस !

news

जिल्हास्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत मिलाग्रीस मराठी प्रायमरीची कु. निधी विजय खडपकर प्रथम

news

Leave a Comment