शिक्षण

स्वराली मुणगेकर शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालक्यातील परांजपे मोतीवाले या विद्यालयातील कु. स्वराली सतिश मुणगेकर या विद्यार्थिनीने इ.8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून चिपळूण तालुका गुणवत्ता यादीत 6 वा क्रमांक व रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत ४९ वा क्रमांक मिळविला.

तिच्या या यशाबद्दल तिचे वडील सतिश मुणगेकर व आई संस्कृती मुणगेकर, मामा, मामी, काका, काकी, आजी ,आजोबा सर्व मुणगेकर आणि कांबळे परिवार व मित्र मंडळी यांनी अभिनंदन केले.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्येही स्वरालीने तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीत उज्वल यश संपादन केले होते.उज्वल यशाची परंपरा तिने कायम राखली.तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामध्ये प्रशालेतील सर्व शिक्षक व आई वडील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Spread the love

Related posts

एस.एस.सी. निकाल तालुक्यांत ११ शाळांचा निकाल १०० % न्यू इंग्लिश स्कूलची ज्ञानेश्वरी पागिरे केंद्रात प्रथम!

news

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल घोषित!ठाणे येथील कश्मिरा संखे देशात २५ वी, तर राज्यातील १५ जणांचा श्रेणीत समावेश!

news

कळसुलकर हायस्कूलमध्ये इतिहासाची साधने व प्रदर्शन संपन्न

प्रसाद परब

Leave a Comment