शिक्षण

कळसुलकर हायस्कूलमध्ये इतिहासाची साधने व प्रदर्शन संपन्न

Spread the love

सावंतवाडी: कळसुलकर हायस्कूलमध्ये शिव संस्कृती प्रतिष्ठान सावंतवाडी तसेच दुर्ग रक्षक प्रतिष्ठान नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत व कळसुलकर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासाची साधने व प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सदर संस्थेचे पदाधिकारी व प्रशालेतील शिक्षक वृंद यांनी केली. तसेच सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री एस.व्ही भुरे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री ज्ञानेश्वर राणे यांनी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना इतिहासाची साधने यांची ओळख व प्रात्यक्षिक करून दाखवले, त्याचप्रमाणे त्याचे महत्त्व विशद केले. यावेळी माजी विद्यार्थी बजरंग दलाचे ज़िल्हा संयोजक श्री कृष्णा धुळपनावर, तालुका संयोजक श्री जितेंद्र रायका तसेच वेगुर्ला तालुक्याचे संयोजक श्री.मयुरेश पेडणेकर,शिवसंस्कृतीचे सदस्य कु. मयुरेश परब, कु.पायल पेडणेकर, कु.आदित्य हरमलकर, कु. कुणाल नार्वेकर व इतर सदस्य यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.

या कार्यक्रमाचा लाभ इयत्ता पाचवी ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांनी घेतला. तसेच या कार्यक्रमासाठी प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री दिगंबर सारंग यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री ठाकूर सर यांनी मानले.


Spread the love

Related posts

१२ परीक्षेत म्हसळयांतील आयडीयल ज्युनीअर कॉलेज १०० % तर अन्य ५ कॉलेजचा ९५ %च्यावर निकाल! .

news

फ्लोरेट कॉलेज येथे मोफत फॅशन डिजाईनिंग बॅचचे यशस्वी आयोजन!

news

शासकीय शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांसह गणवेश, बूट आणि वह्या शासनाकडून मिळणार! शिक्षणमंत्री दीपक केसरकर

news

Leave a Comment