स्टोरी

माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री फाउंडेशन च्या माध्यमातून येत्या 19 व 20 ऑगस्ट या दोन दिवसात कालावधी सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष तथा माझी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण बचाव च्या दृष्टीने अभियान अंतर्गत वृक्ष संवर्धन आणि जतन माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एक झाड लावण्याची अभिनव कल्पना अनुसार सुपारीची रोपे शाळेत वाटप उपक्रम राबवला जाणार आहे. त्याचबरोबर दशावतार नाट्य प्रयोग या माध्यमातून दशावतार कलाकारांना प्रोत्साहन देणे तसेच सह्याद्री फाउंडेशनच्या सदस्यांचा पाल्य गुणगौरव सोहळा असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊत व अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी दिली. सह्याद्री फाउंडेशन ची कार्यक्रम नियोजन बैठक संजू परब यांच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ,सचिव प्रताप परब, ॲड. संतोष सावंत,प्रल्हाद तावडे, सुनील खानोलकर, तारकेश सावंत, अशोक सांगेलकर तसेच विजय चव्हाण प्रमोद सावंत, हर्षवर्धन धारणकर, सुहास सावंत, श्री गजानन बांदेकर, विभावरी सुकी, संदीप सुकी आदी पदाधिकारी उपस्थित होते . त्यावेळी सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष श्री. संजू परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही सामाजिक उपक्रम राबवण्याचे निश्चित करण्यात आले

१९ ऑगस्टला.संजू परब यांचा वाढदिवसानिमित्ताने सावंतवाडी येथील गोविंद चित्रमंदिर येथे संध्याकाळी 7.00 वाजता सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ कसई दोडामार्ग यांचा कृष्ण हनुमान युद्ध हा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान गौरव सोहळा सायंकाळी 8:30 वाजता केला जाणार आहे. यामध्ये माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी विजय चव्हाण यांचा विशेष गौरव केला जाणार आहे. 20 ऑगस्ट ला सह्याद्री पट्ट्यातील शाळांमध्ये वृक्ष संवर्धन व जतन उपक्रम नुसार सकाळी 10.30 वाजता कलंबिस्त हायस्कूलमध्ये सुपारीची 100 झाडे विद्यार्थ्यांना वाटप व दुपारी 12 वाजता आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय कुणकेरी येथे शंभर सुपारीची झाडे विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. या उपक्रमात सहभागी व्हावे.असे आवाहन फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

नागोठणे येथे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले मार्गा’चे संतांच्या हस्ते अनावरण!

news

मुणगे येथे महाआरती सह कारसेवकांचा सत्कार…!

news

राठीवडे विश्वकर्मा मंदिर येथे सांस्कृतिक सभागृह मंजूर करून मालवण तालुका सुतार समाजाची आ. वैभव नाईक यांनी केली स्वप्नपूर्ती ; विश्वकर्मा जयंतीचे औचित्य..!

news

Leave a Comment