Uncategorized

शिवसेना दैनंदिनी २०२४ चे ‘मातोश्री’ येथे प्रकाशन!

Spread the love

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी शिवसेना दैनंदिनी २०२४ चे प्रकाशन मातोश्री निवासस्थानी करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव – खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते, विभागप्रमुख – आमदार ऍड. अनिल परब, शिवसेना दैनंदिनी निर्मिती प्रमुख जी. एस. परब, साकेत शरद पवार आदी उपस्थित होते. शिवसेना दैनंदिनी २०२४ मध्ये शिवसेना नेते, उपनेते, शिवसेना सचिव, संघटक, प्रवक्ते, खासदार, आमदार, विभागप्रमुख, विभाग संघटक, शाखाप्रमुख, शाखा संघटक, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख तसेच शिवसेनेच्या विविध अंगीकृत संघटना, इतर राज्यातील पदाधिकारी यांची इत्यंभूत माहिती आहे. ही दैनंदिनी ७ जूनपासून शिवसेना भवन येथे उपलब्ध असेल.


Spread the love

Related posts

‘एंगेज्ड २’ या रिॲलिटी शोमधील अश्लीलतेवर कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन.

प्रसाद परब

सर्वोच्च न्यायालयाची विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस!आमदारांच्या पात्रतेच्या निर्णयाला विलंब होत असल्याचे प्रकरण!

news

आसोली गावातील कुकेरखेंड येथील रस्त्याची दुरावस्था!

news

Leave a Comment