स्टोरी

बागवे हायस्कुल मसुरे येथे इकोफ्रेंडली होळी!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: आर. पी. बागवे हायस्कूल व एम. जी. बागवे तांत्रिक विद्यालय मसुरेच्या विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडली होळीचा आनंद घेतला. होळी या सणाचे औचित्य साधून त्या निमित्ताने खेळण्यात येणारी रंगपंचमी पर्यावरणपुरक रंगांनी साजरी करण्याबाबत प्रशालेतील हरितसेना शिक्षक श्री आर. एल. पाताडे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. पाने,फुले, फळे व निसर्गातील विविध घटक वापरून रंग तयार करण्याबाबत माहिती दिली. मुलांनी निसर्गातील विविध घटक वापरून रंग बनविले.यावेळी प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका जाधव मॅडम ,भोगले मॅडम, भरत ठाकूर, शशांक पिंगुळकर, हळवे सर, समीर नाईक, घाटे सर उपस्थित होते.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा पंधरावडा निमित्त विविध स्पर्धा संपन्न.

news

राष्ट्रवादी लोकसभा डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ. वंदना मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल!

news

कोलझर येथील निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

प्रसाद परब

Leave a Comment