स्टोरी

उद्योजक राजन आंगणे काळाच्या पडद्याआड…!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: येथील क्रशर व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक राजन आंगणे यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.  ते कारिवडे येथील क्रशर परिसरात असलेल्या आपल्या घरात मृतावस्थेत आढळले. सायंकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या मित्र परिवाराकडून कुटीर रुग्णालयात मोठी गर्दी करण्यात आली होती.

उद्योजक राजन आंगणे सामाजिक कार्यात कायम अग्रेसर होते. सर्वसामान्यांचे ते कायम पाठिशी राहत त्यांनी उद्योजक म्हणून आपला नावलौकिक मिळवला होता. आंगणे हे मूळचे मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील होते. त्यांचा सामाजिक क्षेत्रात मोठा वावर होता. उद्योजक राजन आंगणे  व्यवसायानिमित्त कारिवडे-भैरववाडी येथे स्थायिक झाले होते. तेथेच त्यांनी त्रिमूर्ती स्टोन क्रशर या नावाने उद्योग व्यवसाय उभा केला होता. तसेच बाजूला निवासस्थान होते. त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.


Spread the love

Related posts

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने वस्त्रहरणकार कै. गंगाराम गवाणकर यांना वाहिली श्रद्धांजली

news

मालवण तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कारांचे थाटात वितरण     

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थानांना दानरूपाने मिळणाऱ्या किंवा देवस्थानांद्वारे खरेदी केलेल्या जमिनींच्या हस्तांतरण व्यवहारावरील मुद्रांक नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करा..! महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

news

Leave a Comment