शिक्षण

एम.के. सी. एल.ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे जिल्हास्तरीय यश…!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स अर्थात मृदू कौशल्ये (मुलांच्या वयोगटानुसार शालेय विश्वातील प्रसंग तसेच त्यांच्या भावविश्वातील गोष्टी) गरजेची असतात. इयत्ता ५ वी ते ९ वी तील एस.एस.सी.बोर्डच्या मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषयांची तयारी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी असलेले उपयुक्त अंगभूत गुण तपासण्यासाठी ‘एम.के.सी.एल. ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा-परीक्षा २०२३ अर्थात ‘एम.ओ.एम.’ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आली होती.सदर परीक्षेसाठी राज्यभरातून २०००० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत सावंतवाडीमधील सरकारमान्य एम.एस.- सी.आय.टी.केंद्र आनंदी कॉम्प्यूटर्स यांच्या विद्यमाने स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल निरुखेवाडीचा, इयत्ता ५ वी चा विद्यार्थी ‘कु. वैष्णव उदय सावंत’ याने सहभाग घेतला होता. त्याने जिल्हास्तर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याबद्दल या विद्यार्थ्याला शैक्षणिक भेटवस्तू , प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कामगिरीबद्दल ‘कु. वैष्णव उदय सावंत ‘ या विद्यार्थ्याचे स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांनी कौतुक केले. तसेच, आनंदी कॉम्प्युटर्सचे संचालक श्री. मेघश्याम काजरेकर, शालेय शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी अभिनंदन केले व त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Related posts

शिक्षक भारती आंदोलनाचा प्रभाव; वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव अखेर मंजूर.

प्रसाद परब

रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये दहावीतील विशेष गुणवंतांचा गौरव.

प्रसाद परब

शासकीय शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांसह गणवेश, बूट आणि वह्या शासनाकडून मिळणार! शिक्षणमंत्री दीपक केसरकर

news

Leave a Comment