स्टोरी

कार अपघातात कुडाळची “ऐश्वर्या कवठणकर” जागीच ठार…!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: थर्टी फर्स्ट आणि नव्या वर्षाचे स्वागत सावंतवाडीत करून कुडाळ येथे पहाटेच्या सुमारास जात असताना चार चाकी कोलगाव नजीक एका झाडावर आढळल्याने चार चाकी वाहनातील २१ वर्षीय तरुणी ऐश्वर्या महेश कवठणकर ही जागीच ठार झाली. तर चार चाकी चालक तिचा मित्र सिद्धार्थ बांदेकर हा जखमी झाला आहे. तर अन्य दोन तरुण यांनाही दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुडाळ येथील मित्र व त्यांची मैत्रीण अशी चौघेजण कुडाळ येथे थर्टी फर्स्ट घरी केल्यानंतर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सावंतवाडीत चार चाकी वाहनाने आले होते. नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषी केल्यानंतर सावंतवाडीतून घरी परतताना कोलगाव आकेरी मार्गे कुडाळ येथे जात असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चालक सिद्धार्थ बांदेकर यांची कार भल्या मोठ्या झाडाला आढळली अन अपघात झाला.

अपघाताची खबर कळतच सिद्धार्थ बांदेकर चा मामा राजू वाळके व त्याचे मित्र मंडळाने धाव घेत जखमी तरुणांना गाडीच्या बाहेर काढले तर गाडीत असलेली कुमारी ऐश्वर्या कवठणकर हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. गाडीमध्ये अडकल्याने या सर्वांना गाडी बाहेर काढण्यात आले आणि पोलिसांच्या मदतीने सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सावंतवाडी रुग्णालयात ऐश्वर्या कवठणकर हिचे वडील, काका व मित्रमंडळाने धाव घेतली. ऐश्वर्या कवठणकर ही कुडाळ येथे उत्कर्ष नगर, रामेश्वर प्लाझा, पिंगुळी येथे राहते. आई-वडील, भाऊ व दोन काका काकी असा परिवार आहे.

ऐश्वर्या कवठणकर हिचे सिद्धार्थ बांदेकर यांच्यासोबत याच्यासोबत लग्न ठरवण्यात आले होते. मात्र काही महिन्यानंतर दोघांचे लग्न होणार होते. मात्र काळाने ऐश्वर्यावर घाला घातला आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंब शोक सागरात बुडाली आहेत. पोलीस अधिकारी श्री गोते व मनोज राऊत आधी काम पाहत आहेत.


Spread the love

Related posts

हिंदवी स्वराज्य विस्तारक श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या मातोश्री महाराणी येसूबाई यांची समाधी सापडली!

news

महिला उत्कर्ष समिती कुडाळ चा ओरोस पोलिसांना रक्षाबंधन करून सण साजरा केला…

news

इस्रायलवरील आक्रमणातून बोध घेऊन भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलणे आवश्यक ! ब्रिगेडियर हेमंत महाजन

news

Leave a Comment