स्टोरी

कारागृहातील बंदीवानांना ‘श्रीमदभगवतगीता आत्मसाक्षात्काराचे विज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन इस्कॉनच्या सावंतवाडी विभागाच्यावतीने आयोजन…!

Spread the love

सावंतवाडी: इस्कॉनच्या सावंतवाडी विभागाच्यावतीने सावंतवाडी कारागृहातील बंदीवानांसाठी
‘श्रीमदभगवतगीता आत्मसाक्षात्काराचे विज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कणकवली येथील एस एस पी एम इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेश साटम यांनी कारागृहातील बंदीवानांना दोन तास या विषयावर अध्यात्मिक मार्गदर्शन केले.
यावेळी कारागृह अधिक्षक संदीप एकशिंगे यांनी अशा अध्यात्मिक कार्यक्रमामुळे बंदीवानांच्या जीवनात शारीरिक, बौद्धिक, भावनिक व आध्यात्मिक परिवर्तन होऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी कारागृह तुरुंगाधिकारी संजय मयेकर यांनी कारागृहातील बंदीवानांसाठी हा अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल इस्कॉनच्या सावंतवाडी विभागाचे आभार मानले.
यावेळी इस्कॉनसे अनिरुद्ध प्रभूजी, दत्ताराम देसाई, दाऊजी बलराम, प्रवीण पवार कुमार पाटील, प्रकाश रेडकर, कारागृहाचे सुभेदार श्री धुमाळ आदी कारागृह कर्मचारी आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

पुण्यात पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील जंगलात बाँबस्फोटाची चाचणी केल्याचे उघड!

news

दुकानांच्या पाट्या मराठीत लावा, अन्यथा ‘खळखट्याक’ (तोडफोड) करू !

news

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही छत्रपती शिवरायांच्या प्राचीन मंदिराला निधी न देणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा.

news

Leave a Comment