स्टोरी

तुळसुली येथे हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

Spread the love

बुडक्याची वाडी मंडळाची दिंडी ठरली खास आकर्षण….

 

मसुरे प्रतिनिधी:

 

कुडाळ तालुक्यातील तुळसुली येथे लिंगेश्वर मंदिरामध्ये १७ नोव्हेंबर रोजी सुरु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. या निमित्त मंदिर परिसराची रंगरंगोटी तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

सप्ताहामध्ये दररोज रात्री ग्रामस्थांनी तसेच इतर गावातील भजनी मंडळांनी सुमधुर भजनाचे सादरीकरण केले.

यामध्ये सहाव्या रात्री बुडक्याचीवाडी मंडळाची ट्रीकसीन युक्त “पृथ्वी प्रदक्षिणा” ही दिंडी आकर्षण ठरली. सोबत ढोल पथक , फटाक्यांच्या आतीषबाजीने रंगत आणली.

यावेळी गावातील भजनी मंडळासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Related posts

पीएमश्री शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

news

घे भरारी फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या ग्रुप डान्स आधी स्पर्धाना उत्स्फूर्त प्रतिसाद.

news

देव तेथेचि जाणावा!

news

Leave a Comment