स्टोरी

ओटवणे येथील प. पू. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १० वा पुण्यतिथी उत्सव गुरूवारी उत्साहात संपन्न

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: ओटवणे येथील प. पू. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १० वा पुण्यतिथी उत्सव गुरूवारी उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त समाधी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

प. पू. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज हे माणगाव येथील प पू परिवज्रकाचार्य श्री परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांच्या थोर गुरुपरंपरेतील वैद्यराज परमपूज्य बाबा महाराज मानवतकर यांचे पट्ट शिष्य होते. कुडाळकर महाराज यांच्या पुणे गोखलेनगर येथील श्री दत्त सदनाय गेल्या ५५ वर्षांपासून श्री गुरुचरित्र अखंड पारायण सप्ताह, श्री दत्त जयंती, श्री दत्त याग, गुरुपौर्णिमा आदी कार्यक्रम अखंडपणे सुरू आहेत. गुरुकृपेने त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून हजारो रोगी बरे करताना असंख्य लोकांना व्यसनमुक्त करून त्यांच्या कुटुंबांचे कल्याण केले. त्यांचे देशभरासह जर्मनी, अमेरिका, युरोप, मॉरीशिअस परदेशात हजारो प्रचंड शिष्यवर्ग आहे.

कुडाळकर महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ९ वाजता सर्व देवतांचे पूजन, सकाळी ९:३० वाजता प पू प्रेमानंद स्वामी महाराजांच्या मूर्तीला महाअभिषेक, सकाळी ११ वाजता श्री गुरुदत्त प्रसादिक भजनी मंडळ (पुणे), ह भ प अशोक महाराज गुरव आणि श्री गोरक्षनाथ महाराज टाव्हरे यांचे सुश्राव्य भजन व कीर्तन झाले. दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद त्यानंतर सायंकाळी पारंपारिक वारकरी हरिपाठ, पारंपारिक पंचपदी नामस्मरण, नामसंकीर्तन आदी कार्यक्रमांनी भाविक मंत्रमुग्ध झाले.


Spread the love

Related posts

‘सरकारी मंदिर समिती’च्या नाकर्तेपणामुळे मंदिराला कोट्यवधी रुपयांचे नुकसान…!

news

सावंतवाडी शहरातील मोती तलावात मंगळवारी रात्री पडलेल्या युवतीचा मृतदेह आज सापडला….

news

मिलाग्रीस हायस्कूल व जुनिअर कॉलेज सावंतवाडीच्या पटांगणावर “प्रायमरी ए ॲन्युल फंक्शन कम ग्रॅज्युएशन डे ” च्या कार्यक्रमाचे आयोजन…!

news

Leave a Comment