स्टोरी

श्री देव रामेश्वर- नारायण पालखी सोहळ्यात आ. वैभव नाईक यांनी सहभागी होत घेतले दर्शन

Spread the love

सिंधुदुर्ग:  ढोल ताशाच्या गजरात, गुलाल अन फुलांची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीत मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर- श्री देव नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा आज भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडला. या पालखी सोहळ्याला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

परंपरेने बलिप्रतिपदेच्या दिवशी हा पालखी सोहळा पार पडतो. असंख्य भाविक भक्तगण या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतात. यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक भक्तगणांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.दरवर्षीप्रमाणे आ. वैभव नाईक यांनी पालखी प्रदक्षिणेत सहभागी होऊन श्री देव रामेश्वर- श्री देव नारायण देवतेचे दर्शन घेतले.

            यावेळी भाई गोवेकर, हरी खोबरेकर, महेश कांदळगावकर,मंदार केणी, मंदार ओरसकर, बाबी जोगी,अन्वय प्रभू,सन्मेष परब,तपस्वी मयेकर,मनोज मोंडकर, सिद्धेश मांजरेकर,हेमंत मोंडकर,करण खडपे, सेजल परब,आकांक्षा शिरपुटे,माधुरी प्रभू,अक्षय भोसले आदींसह हजारोंच्या संख्येने मालवण वासीय उपस्थित होते.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे कार्यकर्ता व कर्मचारी यांच्यासाठी एकदिवशीय मार्गदर्शन शाळेचे आयोजन… “

news

ओम साई ट्रॅव्हल्स चे मालक रमेश उर्फ बाळा लक्ष्मण साळगावकर यांचे निधन!

news

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा सावंतवाडी शाखेतर्फे व जिल्हा शाखेच्या वतीने त्यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान.

news

Leave a Comment