स्टोरी

मराठा समाजाच्‍या आरक्षणासाठी मराठवाड्यात ४०० हून अधिक गावांमध्‍ये उपोषण चालू !

Spread the love

हिंगोली आणि नांदेड जिल्‍ह्यांतील १९१ गावांत पुढार्‍यांना प्रवेशबंदी !

२८ ऑक्टोबर वार्ता: मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत आहे. ८ पैकी ५ जिल्‍ह्यांमध्‍ये ४०० हून अधिक गावांत आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्‍या उपोषणाला पाठिंबा देत ग्रामस्‍थांनी उपोषण चालू केले आहे, तर हिंगोली आणि नांदेड जिल्‍ह्यांतील १९१ गावांत पुढार्‍यांना प्रवेशबंदी अन् निवडणुकीवर बहिष्‍कार घालण्‍याचा निर्णय ग्रामस्‍थांनी घेतला आहे. ग्रामस्‍थांनी तशी शपथ घेतली आहे, तसेच तालुकास्‍तरावर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण चालू करण्‍यात आले आहे. परभणी जिल्‍ह्यात ५० गावांमध्‍ये सकल मराठा समाजाच्‍या वतीने साखळी उपोषण चालू करण्‍यात आले आहे. हिंगोली जिल्‍ह्यातील ५६३ गावांपैकी १०० हून अधिक गावांनी राजकीय नेत्‍यांना गावात प्रवेश बंदी केली. अनेक गावांतून आरक्षणाला पाठिंबा वाढत आहे. धाराशिव जिल्‍ह्यात १०० हून अधिक गावांमध्‍ये तरुणांनी साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे.


Spread the love

Related posts

कातवड येथे आगीत जळालेल्या रवींद्र परब यांच्या घराची आ. वैभव नाईक यांनी पाहणी करत केली आर्थिक मदत

news

सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टँड समोरील उघडे असलेले गटार बंद करून आंबोलीकडे जाणारा अरुंद रस्ता रुंद करण्यात यावा ! सामाजिक बांधिलकीची मागणी.

news

सरकार आपले दारात या उपक्रमावर संदीप जगताप यांची प्रतिक्रिया….

news

Leave a Comment