Uncategorized

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या..

Spread the love

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कुमार आशिष गेहालयान वय- वर्ष १९ याने सोमवारी पहाटे तो राहत असलेल्या वसतिगृह इमारतीच्या एका खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मूळचा कर्नाल, हरियाणा येथील असलेला आशिष हा मागील वर्षभरापासून वसतिगृहात राहत होता. सध्या कॉलेज मध्ये पहिल्या वर्षाची प्रॅक्टिकल सुरू आहेत. परीक्षेला सामोरे जात असतानाच त्याने आत्महत्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्याने हे पाऊल का उचलेले? आत्महत्या का केली? याबाबतचे कारण स्पष्ट झाले नसून, पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


Spread the love

Related posts

कणकवली तालुका वैश्य समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा

प्रसाद परब

मालवण शहर भाजप युवा मोर्चाचा दिनांक ०३ मार्च २०२३ रोजी मेळावा…

news

सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गावात दिनांक १ मार्चला जिल्हास्तरीय कृषी पशुसंवर्धन शेतकरी मेळावा आयोजित…

news

Leave a Comment