स्टोरी

हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यामुळे एस.आर. दळवी फाउंडेशनने समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेली स्वच्छता मोहीम स्थगित!

Spread the love

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हयात हवामान खात्याने कमी दाबाच्या पट्टयामुळे ४८ तासात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे एस. आर. दळवी फाउंडेशनने सोमवारी २ ऑक्टोंबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेली स्वच्छता मोहीम स्थगित केली आहे.

विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र दळवी आणि सिता दळवी या दांम्पत्याने स्थापन केलेल्या बहुउद्देशीय अशा राज्यस्तरीय एस.आर. दळवी फाउंडेशनने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या ६७ व्या जयंतीचे औचित्य साधुन पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने प्रत्यक्ष कृतीसह जनजागृतीसाठी वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.

 

       मात्र हवामान खात्याने जिल्हयात रेड अलर्ट इशारा दिल्यामुळे ही स्वच्छता मोहिम तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग व मुंबई कोअर कमिटीने घेतला आहे. सदर मोहिमेची नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन एस आर दळवी फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सचिन कृष्णा मदने, उपाध्यक्ष चेतन बोडेकर, सरचिटणीस विजय गावडे यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

मसुरे भरतेश्वर मंदिर येथे रामनवमी उत्सवात सुरुवात …

news

असे हि समाजघातक माणूस समाजात असतात..! अखेर त्या अमानुष तानाजी कांबळे प्राध्यापकाने त्या मागासवर्गीय कुटुंबाच्या झोपडीवर जेसीबी फिरवलाचं..! रवी जाधव.

news

समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नये, यासाठी महामृत्यूंजय जप केल्याबद्दल गुन्हा दाखल करणे निषेधार्ह! श्री. सुनील घनवट

news

Leave a Comment