राजकारण

निर्णय घ्यायला विधानसभा अध्यक्षांना वेळ नाही! खासदार संजय राऊत.

Spread the love

३० सप्टेंबर वार्ता: १६ आमदार अपात्र निर्णयावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करतायेत, ते १ वर्षापासून करतायेत, त्यात नवीन काय? आता घाना दौऱ्यावर होते, तिथे लोकशाहीवर भाषण होते. लोकशाही वाचवणे विधानसभा अध्यक्षांच्या हाती आहे. आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्याचा सुप्रीम कोर्टाने कालमर्यादा दिली, विधानसभा अध्यक्षांच्या घाना दौऱ्याला आम्ही विरोध केला. आम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारी होतो. विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही मानायला तयार नाहीत. राज्यात घटनाबाह्य सरकार विधानसभा अध्यक्षांच्या मदतीने चालवले जातंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरतील असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे असतानाही त्यांच्यासंदर्भात निर्णय घ्यायला विधानसभा अध्यक्षांना वेळ नाही. ते घानाला जाणार होते, परंतु आता त्यांचा दौरा रद्द केला आहे. असं संजय राऊतांनी सांगितले.


Spread the love

Related posts

नितेश राणेंची उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर हल्लाबोल

news

राज्यात पुन्हा एकदा होणार राजकीय महाभूकंप!

news

देशाच्या कोणत्याही काना कोपऱ्यात असले तरी आपल्या कोकणचा विचार करणारे कार्यसम्राट उमेदवार मा. नारायण राणे साहेब यांना लोकसभेत पाठवुया – प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी.

news

Leave a Comment