स्टोरी

चंद्रपूर येथे खोदकाम करतांना पांढरे आणि काळे शिवलिंग सापडले ! 

Spread the love

चंद्रपूर:  जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी येथे खोदकाम करतांना भूमीत २ शिवलिंग सापडले. यातील एका शिवलिंग काळ्या रंगाचे असून दुसरे पांढर्‍या रंगाचे आहे. हे शिवलिंग पहाण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. याविषयी ज्येष्ठ पुरातत्व विशेषज्ञ आणि इतिहास संशोधक अशोकसिंह ठाकूर यांनी म्हटले की, भोसलेशाहीच्या काळात या परिसरात अनेक हेमाडपंथी शिवमंदिरे होती. त्याचाच एक भाग म्हणून हे शिवलिंग असायला हवे.

 

नेरी या गावात हेमांडपंथी पार्वतीमातेचे मंदिर आहे. या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होतो. वर्षभर येथे भाविक दर्शनाला येतात. त्यामुळे ‘या ठिकाणी सभागृह असावे’, अशी भाविकांची मागणी होती. त्यानंतर आमदार निधीतून सभागृह करण्याचे काम संमत करण्यात आले. त्या वेळी खड्ड्यांचे खोदकाम करतांना दोन्ही शिवलिंग सापडले.


Spread the love

Related posts

मसुरे स्वामी समर्थ मठाचा २६ पासून वर्धापनदिन सोहळा!

news

प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गचे १२ जून रोजी धरणे आंदोलन!जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांची माहिती

news

मालवण बोर्डिंग ग्राउंडची दुरुस्ती न केल्यास सा. बां. विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार…! आमदार वैभव नाईक यांचा इशारा

news

Leave a Comment