स्टोरी

सांस्‍कृतिक कार्य विभागाच्‍या पुरस्‍काराच्‍या रकमेत दुपटीने वाढ ! – सुधीर मुनगंटीवार

Spread the love

मुंबई:  गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्‍कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्‍कार, संगीताचार्य अण्‍णासाहेब किर्लोस्‍कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्‍कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्‍त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्‍कार या पुरस्‍कारांची रक्‍कम ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपये, तर राज्‍य सांस्‍कृतिक पुरस्‍काराची रक्‍कम १ लाख रुपयांवरून ३ लाख रुपये करण्‍यात आली आहे, अशी माहिती सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.सांस्‍कृतिक कार्य विभागाकडून देण्‍यात येणार्‍या विविध पुरस्‍कारांच्‍या निवड समितींच्‍या प्रतिनिधींची बैठक २९ ऑगस्‍ट या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीत पुरस्‍काराच्‍या रकमेत वाढ करण्‍याचा निर्णय घोषित करण्‍यात आला.


Spread the love

Related posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा….!

news

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात इलेक्ट्रिकल वाहन दाखल.

प्रसाद परब

चतुर्थीत चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून ३०७ एसटी बस सोडणार!

news

Leave a Comment