स्टोरी

आजगांव येथे “गुरूवंदना २०२३” संगीत सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न!

Spread the love

श्री राधाकृष्ण संगीत साधना शिष्यपरिवाराचे आयोजन!

मान्यवरांचे स्वागत करतांना सौ. विना दळवी

सावंतवाडी प्रतिनिधी: संगीत अलंकार गुरुवर्या सौ. वीणा दळवी संचलित ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना’ शिष्यपरिवाराच्या वतीने “गुरूवंदना २०२३” हा संगीत सोहळा शनिवार दि. ०५ ऑगस्ट २०२३ रोजी श्री देव वेतोबा मंदिर सभागृह आजगांव येथे दिमाखात संपन्न झाला. यावेळी गोवा येथील ज्येष्ठ संवादिनी वादक श्री राया कोरगांवकर सर, सुप्रसिद्ध किर्तनकार डाॅ. श्रीराम दिक्षीत सर, सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक गुरूवर्य श्री निलेश मेस्त्री सर प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. संगीत क्षेत्रातील या ज्येष्ठ मंडळींनी यावेळी विद्यार्थ्यांना सुंदर असे मार्गदर्शन केले.

सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध गायिका सौ. मंजिरी धोपेश्वर, शिवसेना नेते एकनाथ नारोजी, ज्येष्ठ नाट्यकर्मी श्री भाऊ साळगांवकर, अभिनेते श्री धुमे, सुनाद रेकाॅर्डिंग स्टुडिओचे संचालक श्री अनंत नाईक, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते श्री मृणाल गोसावी, सुप्रसिद्ध पखावज/ढोलकी वादक श्री अनय सावंत, पत्रकार प्रसाद परब, दिनेश मयेकर, योगिता कानडे आदी मान्यवरांचीही या सोहळ्याला उपस्थिती लाभली.

मान्यवरांचे स्वागत करतांना सौ. विना दळवी
गायन – वादन सादर करतांना ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना शिष्यपरिवाराचे’ शिष्य.
श्री राधाकृष्ण संगीत साधना शिष्यपरिवार

आसोली येथील युवा निवेदक श्री शुभम धुरी यांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी गायन-वादन सादर करून गुरुंप्रती संगीतमय गुरुवंदना वाहिली. संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, संगीतप्रेमी रसिक आणि विद्यार्थ्यांचे पालकवर्ग यांनी यावेळी उपस्थित राहून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. सर्वच शिष्य परिवार आणि स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगांवचे श्री गजा पांढरे, श्री अविनाश रायशिरोडकर, पखावजवादक श्री दत्ताराम उर्फ अनय सावंत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

‘आध्यात्मिक संगीत’ या यु-ट्युब चॅनेलच्या माध्यमातून ध्वनिमुद्रित करण्यात आलेल्या ‘श्री देव वेतोबा मंत्रा’चे यावेळी अनावरण करण्यात आले. विद्यालयाची विद्यार्थीनी कु. दिक्षा काकतकर हिचा आवाज त्यासाठी लाभला असून मुंबई येथील श्री मृणाल गोसावी सर यांनी त्याची निर्मिती केली आहे. सुनाद रेकाॅर्डिंग स्टुडिओ न्हावेली येथे त्याचे रेकाॅर्डिंग झाले आहे. याच चॅनेलच्या माध्यमातून विद्यालयाच्या अजुन काही विद्यार्थ्यांच्या आवाजात अजुन काही गाणी रेकाॅर्ड झाली असून ती लवकरच प्रदर्शित होतील.


Spread the love

Related posts

आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

news

सावंतवाडी मळगाव वाचनालय येथे दिवाळी अंक प्रकाशन सोहळा संपन्न.

news

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे हिंदी भाषा दिन साजरा!

news

Leave a Comment