स्टोरी

मुंबई शहराच्‍या प्रवेशद्वारांवरील पथकर नाके तातडीने बंद करा ! आमदार आदित्‍य ठाकरे

Spread the love

८ ऑगस्ट वार्ता: शहरातील पश्‍चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग काही मासांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम्.एम्.आर्.डी.)कडून देखभालीसाठी स्‍वत:कडे घेतले आहेत. या महामार्गांवरील पथकर नाके तातडीने बंद करावेत, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार आदित्‍य ठाकरे यांनी ७ ऑगस्‍ट या दिवशी पत्रकार परिषदेत केली.याविषयी आदित्‍य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्‍या आयुक्‍तांना पत्र पाठवले आहे. ‘महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाच्‍या अखत्‍यारीत असलेले रस्‍ते आणि पूल यांसाठी पथकर लावणार आणि त्‍याच वेळी मुंबई महानगरपाकिलेकडूनही अधिकचा कर वसूल केला जाणार, हा मुंबईकरांवर अन्‍याय आहे. जे पथकर नाके २० वर्षांहून अधिककाळ कार्यरत आहेत, त्‍यांवर कायमस्‍वरूपी तोडगा काढणे आवश्‍यक आहे’, अशी मागणी आदित्‍य ठाकरे यांनी या पत्रामध्‍ये केली आहे.


Spread the love

Related posts

लोकशाही देशातील ‘महा सुनावणीचे फलित काय ? आनंद गायकवाड

news

परशुराम गोरे यांचे निधन.

news

मालवण शिवसेना शाखेत शिवजयंती उत्साहात साजरी.

news

Leave a Comment