स्टोरी

बिळवस सरपंच मानसी पालव यांच्या कार्याचा कुणकेश्वर यात्रा उत्सवात सन्मान…!

Spread the love

कुणकेश्वर प्रतिनिधी: बिळवस गावच्या उपक्रमशील सरपंच सौ मानसी पालव यांचा नुकताच कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर यात्रे निमित्त येथील ट्रस्टच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टच्या वतीने बिळवस सरपंच सौ मानसी पालव यांच्या आज वरच्या कार्याचा गौरव करण्यात आला. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्बदे, उद्योजक एकनाथ तेली आंबा बागायतदार अजय नाणेरकर, माजी सरपंच गोविंद घाडी, समाज सेवक अण्णा वाळके आणि ट्रस्टचे सदस्य आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

बिळवस सरपंच मानसी पालव यांनी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे यावेळी आभार व्यक्त करताना येथील ट्रस्ट ग्रामपंचायत आणि ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी यांनी या कुणकेश्वर यात्रेचे अतिशय सुयोग्य असे नियोजन केले असून आज या यात्रेची महती अगदी जगभर झालेली आहे. याबाबत या कुणकेश्वर ट्रस्टचे आणि येथील ग्रामपंचायतचे आणि येथील ग्रामस्थांचे कौतुक करावे तेवढेच थोडे आहे.


Spread the love

Related posts

छत्रपतीचं नाव घेऊन मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसू नका”; संभाजीराजेंना महाराष्ट्र एकीकरण समितीचं पत्र

news

शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड आयोजितभव्य शेतकरी – सभासद मेळावा!

news

हडपीड खालचीवाडी शाळेला एक्वागार्ड भेट! अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर यांचे समाजभान.

news

Leave a Comment