शिक्षण

जि. प. शाळा फणसखोल येथे शिक्षक कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा प्रश्न वाऱ्यावर!

Spread the love

३ ऑगस्ट वार्ता: फणसखोल येथील जि. प. सध्या कायमस्वरूपी शिक्षक नाहीत. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि फाणसखोल येथील ग्रामस्थांनी फणसखोल शाळेत कायम स्वरुपी शिक्षक ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली. याबाबत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षक मिळेल असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. परंतु तसं काही होतांना दिसत नाहीय. यामुळे फणसखोल शाळा व्यवस्थापन समिती आणि फाणाखोल मधील ग्रामस्थ यांनी आज दिनांक गुरुवार दि.३ ऑगस्ट रोजी रोजी गटशिक्षणाधिकारी वेंगुर्ला यांच्या कार्यालयात भेट देऊन परत एकदा निवेदन दिले आहे. यावेळी आमच्या शाळेतील शिक्षक आमच्या शाळेतच हजार करा,असा इशारा शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी दिला आहे.

या शाळेच्या पटावर दोन शिक्षक असूनसुद्धा कायमस्वरूपी एकच शिक्षक कार्यरत दिसतात. असं का? असा प्रश्नही या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. तसेच दोन शिक्षकांची गरज असताना एकच शिक्षक देऊन आमच्या शाळेवर अन्याय होत आहे असे या निवेदनात म्हटलं आहे.

शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने दिलेले निवेदन

फणसखोल या शाळेमध्ये पहिली ते पाचवी असे पाच वर्ग आहेत. त्यामुळे या ठिकाणी दोन शिक्षकांची गरज आहे. या ठिकाणी दोन शिक्षकांची गरज असताना एकच शिक्षक कार्यरत आहेत. एका शिक्षकांना पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गातील विध्यार्थ्यांना शिकवणे आणि त्यानंतर सर्व दप्तरी काम सांभाळणे हे शक्य होत नाही आणि साहजिकच त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर वाईट परिणाम होऊ शकतो हे नाकारता येणार नाही. त्यामुळे ह्या शाळेला लवकरात लवकर आणखी एका शिक्षकांची तात्काळ नेमणूक करणं गरजेचे आहे. परंतु वेळोवेळी आणखी एका शिक्षकाची मागणी करून सुद्धा शिक्षकाची पूर्तता होत नसल्यामुळे आता शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

खेडेगावातील जि. प. शाळांची ही अशी परिस्थिती असल्यामुळेच काही पालकांना आपल्या मुलांना योग्य शिक्षण देण्यासाठी खाजगी शाळांमध्ये दाखल करावे लागत आहे. त्यामुळे साहजिकच खेडेगावातील शाळा बंद पडत आहेत. आज पालकांना आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी खाजगी शाळांमध्ये दाखल करावं लागत असेल आणि त्यामुळे खेडेगावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद पडत आहेत. तर याला नेमका जबाबदार कोण? असा प्रश्न सर्व उपस्थित होतो.

आज काही मंत्री, काही प्रशासकीय अधिकारी जिल्हा परिषद च्या मराठी शाळा बंद पडत आहेत म्हणून चिंता व्यक्त करत आहेत किंवा त्याबाबत भाषण देत आहेत. पण त्यामागे नेमकी कारणं काय? याचा विचार कोण करत आहेत की नाहीत? असे प्रश्न उपस्थित होतात. या सर्व प्रकरणाचा विचार करून फणसखोल वाडीतील ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावतीने आज वेंगुर्ला शिक्षण गटशिक्षण अधिकारी यांना हे निवेदन देण्यात आलं आहे.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. विनोद गावडे, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य श्री. स्वप्निल गावडे आणि फणसखोल वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सरकारविषयी चीड! काय होता अजित पवार यांचा संवाद ?

news

असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय या प्रशालेतील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

news

पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यात ‘एक राज्य, एक गणवेश! राज्यसरकारचा निर्णय

news

Leave a Comment