स्टोरी

नाल्यामुळे दुर्गंधी, शाळकरी विध्यार्थी त्रस्त!

Spread the love

२२ जून वार्ता: सावंतवाडी शहरातील कळसुलकर हायस्कूल जवळून वाहत असलेला नाला उघडा असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. दुर्गंधीचा हा त्रास येथील शाळेतील मुलं सहन करत आहेत. कळसूळकर हायस्कूलच्या गेटवरच हा नाला असल्यामुळे सुरुवातीला शाळेमध्ये प्रवेश करताना प्रथम नाल्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करणे आणि नंतर शाळेत अभ्यासाला सुरुवात करणे परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या एक वर्षापासून तरी ह्या नाल्याची दुर्गंधी शाळकरी मुलांना सहन करावी लागत आहे. सावंतवाडी शहरात मुख्य बाजारपेठेतील तसेच सावंतवाडी नगरपालिका हद्दीत ही शाळा असून शाळेतील मुलांना होणाऱ्या या त्रासाकडे प्रशासनाचा दुर्लक्ष आहे, असे दिसून येत आहे.

कळसुलकर हायस्कूल जवळील नाला

या नाल्याच्या दुर्गंधीमुळे लहान मुलांना साथीचे आजार होण्याची दाट शक्यता आहे. मध्यवस्तीतून आणि शाळेच्या अगदी जवळून वाहणाऱ्या या नाल्यात काही बंगले व सोसायटीधारकांनी गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी सोडले आहे. अशी शंका आहे. तसेच याच नाल्यात कचरा टाकत असल्याने डास वाढले आहेत. नगर पालिकेच्या संबंधित विभागाने पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवणे खूप गरजेचे आहे. या नाल्यामुळे शाळेतील मुलांना डेंग्यू, मलेरिया आणि इतर आजार झाले तर कोणाला जबाबदार धरायचे? असा प्रश्न स्थानिकांकडून आणि शाळेतील मुलांच्या पालकांकडून उपस्थित होत आहे.


Spread the love

Related posts

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदीच ! राज्यशासनाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात माहिती.

news

ओझर विद्यामंदिर संस्था चालकांनी जाणून घेतली वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय शाळा!

news

कोरोनाच्या काळामध्ये आत्मनिर्भर बनण्याचा एक व्यर्थ संघर्ष..! सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांचे मनोगत.

news

Leave a Comment