स्टोरी

मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस “शैलेंद्र पेडणेकर” वाढदिवस विशेष

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: युवा उद्योजक श्री शैलेंद्र पेडणेकर यांचा आज वाढदिवस मित्र परिवारामध्ये उत्साहात साजरा होत आहे. शैलेंद्र पेडणेकर यांची मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून एक वेगळी ओळख आहे. अनेकांना मदतीचा हात देत, अनेकांना आपल्या सोबत पुढे नेण्याचे स्वप्न बाळगणारा सर्वसामान्य कुटुंबातील हा व्यक्ती सर्वांचा लाडका मित्र म्हणून ओळखला जातो. शांत, सुजवळ आणि समजूतदार स्वभाव हि शैलेंद्र पेडणेकर यांची प्रमुख ओळख आहे. स्वतःच्या व्यवसायात प्रत्येक वेळी स्वतःबरोबर असणाऱ्या आपल्या सहकार्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करत व्यवसायात पुढे नेण्याचं काम शैलेंद्र पेडणेकर करत असतात.

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. शैलेंद्र पेडणेकर यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात न जाता सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणातच राहूनच स्वतः व्यवसाय करून स्वतःबरोबरच इतर व्यक्तींना कसं पुढे नेता येईल? यासाठी सतत कार्यरत आहेत. स्वतःबरोबर व्यवसायात सहभागी झालेल्या व्यक्तींना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन, योग्य ते सहकार्य शैलेंद्र पेडणेकर करत असतात. यामुळेच शैलेंद्र पेडणेकर यांचा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप मोठा मित्रपरिवार आहे.

अनेकांचा लाडका मित्र शैलेंद्र पेडणेकर यांचा आज वाढदिवस अनेक मित्रांच्या उपस्थितीत मळगाव येथे साजरा कारण्यात आला. आज सकाळपासूनच फोनवरून मेसेज द्वारे आणि प्रत्यक्ष भेटून अनेकांनी शैलेंद्र पेडणेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सर्वांना पुढे घेऊन जाण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या अशा या मैत्रीच्या दुनियेतल्या राजा माणसाला महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.


Spread the love

Related posts

एस. आर. वाय. प्रोडक्शनचे ‘गणपती बाप्पा तुम्ही लवकर या’ गाणे प्रदर्शित!

news

भाजप नेते व पदाधिकारी यांच्या गुंडगिरीमुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमकुवत..! आ.वैभव नाईक

news

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचे निधन.

news

Leave a Comment