स्टोरी

एअर होस्टेस तरुणीचा संशयास्पद मृत्यू!

Spread the love

मुंबई: मुंबईतील पवई येथे रविवारी दि.३ सप्टेंबर रोजी रात्री एक एअर होस्टेस असलेल्या तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, हत्या कुणी केली याचा तपास सुरू केला आहे.

 

पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील मारवाह रोडवरील एनजी हाऊसिंग सोसायटीत 22-25 वर्षे वय असलेल्या तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. फ्लटॅमध्ये पडलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी 4 पथके तयार केली आहेत.तरुणी एअर होस्टेस आहे आणि ती सध्या प्रशिक्षण घेत होती. ही तरुणी फ्लॅटमध्ये कधीपासून राहतेय? तिची हत्या का करण्यात आली? आणि कुणी केली? याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत.

 

 

 

दरम्यान, सोसायटीतील फ्लॅटमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने इतर रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. मयत तरुणीबद्दल अधिक माहिती मिळवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

 

 


Spread the love

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे उद्या विशेष विमानाने महाराष्ट्रात येणार !

news

पर्यटन विकासासाठी पर्यटन कंपन्यानी भर देऊन दुर्लक्षित कोकण सागरी किनारी पर्यटन वाढवूया..! ललित गांधी

news

गुढी पाडव्यानिमित्त “आरंभ सखी ” ग्रुपच्यावतीनेहिंदू नववर्ष स्वागतासाठी भव्य शोभा यात्रेचे आयोजन.

news

Leave a Comment