क्राईम

अनैतिक संबंधांच्या संशयावरून तरुणाची चाकूने भोसकून हत्या

Spread the love

मुंबई: गोवंडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून सत्तार ऊर्फ पप्पू सय्यदची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी २७ वर्षीय तरुणाला अटक केली. गंभीर जखमी झालेल्या सत्तारला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण सत्तारचा भाऊ अन्सार याच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी पहाटे खानला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संग्रहित छायाचित्र

सत्तारचा भाऊ अन्सार सय्यद याच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी याप्रकरणी हत्या व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. बैंगनवाडी येथील हक्कानी चायनीज सेंटरजवळ शुक्रवारी ही घटना घडली. तक्रारीनुसार, आरोपी मुशीर मंजुर खानने (२७) अनैतिक संबंधांच्या संशयावरून सत्तारला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर खानने चाकूने सत्तारच्या मनगट व छातीत भोसकले. हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केला.पुढील तपास पोलीस करत आहेत.


Spread the love

Related posts

केरळच्या मलप्पुरम येथे पी.एफ्.आय.च्या जिहादी कार्यकर्त्यांच्या घरांवर छापेमारी !

news

खैरतोडीच्या गुन्ह्यात दोन फरार आरोपींना अटकेनंतर २४ ऑगस्ट पर्यंत वनकोठडी!

news

बेलापूरच्या कॅबाना बारमध्ये अल्पवयीन मुलींचा कथित अश्लील नाच; नियमबाह्य कारभारामुळे खळबळ

प्रसाद परब

Leave a Comment