स्टोरीक्राईम

बेलापूरच्या कॅबाना बारमध्ये अल्पवयीन मुलींचा कथित अश्लील नाच; नियमबाह्य कारभारामुळे खळबळ

Spread the love

नवी मुंबई | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : बेलापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सेक्टर १५ येथील कॅबाना बार अँड रेस्टॉरंटमध्ये अल्पवयीन मुलींना रात्री उशिरापर्यंत ग्राहकांसमोर नाचवण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महिलांवर पैशाचा पाऊस पडत असल्याचेही आरोप करण्यात येत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट आदेश दिले होते की, कोणत्याही बारमध्ये तीन-चारपेक्षा अधिक मुली ठेवल्यास त्या बारचा परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल. तरीही कॅबाना बारमध्ये या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.या प्रकरणी नवी मुंबई पोलिस आयुक्त यांनी तातडीने कारवाई करावी आणि बारचा परवाना रद्द करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रकरणाची चौकशी झाल्यास शहरातील अन्य बारमालकांवरही कठोर कारवाईची टांगती तलवार राहील.


Spread the love

Related posts

शिवानी प्रकाशन मुंबई चा वर्धापन दिन मुंबई सायन येथे उत्साहात संपन्न! सिंधू पुत्र समाजसेवक संतोष महाडेश्वर यांचा अनोखा उपक्रम….

news

एका मोबाईल आणि चेनसाठी महिलेचा खून

news

श्री राम वाचन मंदिर  मध्ये स्व. विद्याधर भागवत स्मृती  काव्यवाचन स्पर्धा संपन्न!

news

Leave a Comment