स्टोरी

कवी, गझलकार, गीतकार, लेखक, समीक्षक “श्री.विजय जोशी” युनायटेड अमेरीकन युनिव्हर्सिटीच्या ‘मानद वाङमयाचार्य पदवीने सन्मानीत.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी (दीपक पटेकर): कवी, गझलकार, गीतकार, लेखक, समीक्षक श्री.विजय जोशी (विजो), डोंबिवली (मूळ गाव मसुरे, मालवण, सिंधुदुर्ग) यांच्या मागील‌ जवळपास ३० वर्षांच्या कविता साहित्यातील योगदानाची दखल घेऊन युनायटेड अमेरीकन युनिव्हर्सिटी यांनी ‘मानद वाङमयाचार्य (Doctor of Literature) ( D.Litt.)’ पदवी देऊन विजो यांना सन्मानीत केले आहे. याबद्दल कवी विजो यांचे साहित्य क्षेत्रात सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.वृत्तबद्ध कवितेचा ध्यास घेऊन कविता साहित्यात सक्रीय असलेले विजय जोशी हे ‘विजो’ या टोपण नावाने सर्वपरिचित आहेत. विजो यांनी आजवर वृत्तबद्ध कविता आणि गझलच्या ८० पेक्षा जास्त कार्यशाळा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. याचा लाभ महाराष्ट्र आणि देशा परदेशातील अनेक कवींना झाला असून, आज अनेक जण छान वृत्तबद्ध कविता लिहू लागले आहेत. ही मराठी साहित्यातील एक मोठी उपलब्धी आहे.’वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र)’ हे त्यांचे पुस्तक नवोदित कवींना मोलाचे मार्गदर्शक ठरत आहे. त्यांची ‘बाया’ ही कविता विविध ५६ भाषांमध्ये अनुवादित झाली आहे आणि हा मराठी कवितेच्या अनुवादाचा जागतिक विक्रम ठरला आहे. याशिवाय विजो यांनी विविध ५१ वृत्तांमध्ये आई या एकाच विषयावर काव्यपंक्ती/ लक्षणपंक्ती लिहून (वृत्ताई) जागतिक विक्रम केला आहे. वय वर्षे ५७ असलेल्या विजो यांनी साहित्य क्षेत्रात सक्रियतेने कार्य करीत असतात. कविता संग्रह, अभ्यास पुस्तके, पुस्तक परिचय, अनुवादित कविता, समीक्षा लेख… असे विजो यांचे विविध साहित्य प्रकाशित आहे, प्रकाशित होत असते.


Spread the love

Related posts

गावठणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळाचे सांस्कृतिक कला क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील उपक्रम कौतुकास्पद! विनायक दळवी

news

हिंदु समाजाच्‍या संयमाचा अंत पाहू नका! आमदार नितेश राणे!

news

हिंदळे वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रसाद परब

Leave a Comment