स्टोरी

दाणोली पंचक्रोशीतील कलाकारांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मान

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकणची समृद्ध लोककला म्हणजे दशावतार ही आहे. तो आपला श्वास आहे.यात लाल मातीमध्ये दशावताराचे लालन पालन, पोषण झाले आहे. पारंपरिक पद्धतीने जो दशावतार सादर केला जातो तीच खरी आपली कला आहे. तरुण पिढीने या कलेकडे आदराने पाहून तिचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. असे भाव उदगार रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण परब यांनी काढले. समर्थ साटम महाराज वाचन मंदिर दाणोली. व रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर साटम महाराज वाचन मंदिराचे अध्यक्ष भरत गावडे, सचिव डॉ. एल. डी .सावंत सहसचिव गजानन गावडे, उपाध्यक्ष भास्कर परब ,सदस्य गिरीधर चव्हाण ,माजी सैनिक सहदेव राऊळ, प्रदीप शेवडे ,आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दाणोली पंचक्रोशीतील १२ कलाकारांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला .प्रस्ताविक मनोगतात अध्यक्ष भरत गावडे यांनी मराठी रंगभूमी दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी या नाट्य क्षेत्राकडे एक सकारात्मक दृष्टीने पहावे, सामाजिक,ऐतिहासिक, पौराणिक नाटके आवर्जून पाहावी त व आपल्या लोककलेचा आदर करावा. व गावागावात सादर केलेला दशावतार आपण पाहावा असे मत व्यक्त केले यावेळी सहसचिव, गजानन गावडे यांनी मनोगत व्यक्त करून दशावतार कलेचे महत्त्व समजावून सांगितले मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून रघुनाथ आप्पा सावंत ओवळीये, शिवराम राघोजी सावंत देवसू, संजय सखाराम जाधव ओवळीये,शिवराम सोमा गावडे आंबोली तेजस संजय सोमण केसरी, रामकृष्ण हरी गावडे फणसवडे प्रकाश शंकर गावडे फणसवडे,मनोहर ल. गावडे आंबोली, प्रतिभा महेश चव्हाण,,बाबुराव हरी गावडे,यावेळी या कलाकारांनी आपली कला सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. यावेळी कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त केले रोटरी क्लब सावंतवाडी च्या वतीने पाचवा आनंदी जो कार्यक्रम घेण्यात येत आहे याकरिता शालेय विद्यार्थ्यांना साधना मासिकचे कुमार अंक देऊन गौरविण्यात आले आभार ग्रंथपाल दीपा सुखी आणि मानले. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मान केल्याबद्दल कलाकारांनी ऋण व्यक्त केले.


Spread the love

Related posts

कोमसाप च्या वतीने प्राध्यापक मिलिंद भोसले आणि एडवोकेट दीपक नेवगी स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन !

news

कविवर्य विद्याधर भागवत स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत विजय ठाकर प्रथम.

newss

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त असंख्य स्वामी भक्त पालखी सोबत स्वामींच्या दर्शन भेटीस !

news

Leave a Comment