स्टोरी

कविवर्य विद्याधर भागवत स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत विजय ठाकर प्रथम.

Spread the love

सावंतवाडी (प्रा. भारत गावडे): चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन संस्थेच्या वतीने व श्री राम वाचन मंदिर,सावंतवाडी रा दोन संस्था च्या वतीने ही प्रतिवर्षी ही स्पर्धा विद्याधर भागवत यांच्या नावाने घेतले जाते. स्पर्धेचा निकाल असा प्रथम विजय ठाकर द्वितीय सिलेसदीन फां . शिरोडकर,.तृतीय प्रकाश लक्ष्मण पाटील ,उत्तेजनार्थ उर्जित अरुण परब ,लक्ष्मी लक्ष्मण धारगळकर ,या स्पर्धेसाठी एकूण 31 स्पर्धक सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे व अतिथी म्हणून डॉक्टर श्रीपाद जोशी पुणे हे उपस्थित होते .यावेळी व्यासपीठावर आरती माचसिक चे माजी संपादक प्रभाकर भागवत उपाध्यक्ष उषा परब श्रम वाचन मंदिर चे कार्याध्यक्ष रमेश बोंद्रे अतिथी संपादक डॉक्टर बाळकृष्ण लळीत , कोषाध्यक्ष भरत गावडे, सचिव सुरेश मुकणावर, सुभाष गोवेकर रवींद्र भागवत, क्उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित व प्रतिमा पूजन करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ. जोशी म्हणाले, एखाद्या साहित्यिकांच्या नावे संस्था सुरू करून गेली ४५ वर्ष आरती मासिक संपादित केले जाते. हीच खरी साहित्य परंपरा आहे. नवोदित लेखक, कवी यांना लिहिण्यास प्रवृत्त केले जाते. यातूनच मराठी साहित्य निर्माण होते. मराठी भाषा अधिक विकसित करण्यासाठी वाचनसंस्कृती वाढवा.असे आवाहन केले.

यावेळी आरती मासिक चे माजी संपादक प्रभाकर भागवत यांचा शाळ, श्रीफळ, मोमेंटो देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. भागवत सरांनी मनोगत व्यक्त केले. म्हणाले, सर्वाच्या सहकार्याने वाचकांना पसंती ने आरती मासिक चालू आहे. उषा परब यांनी उपस्थित मान्यवरांच्चे स्वागत केले. व मनोगतात आरती मासिक ची जडणघडणीत सकारात्मक दृष्टीकोन सांगितला. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी मालवणी बोली भाषा आरती विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्थापक संपादक विघाधर भागवत, व सी. स उपाध्ये यांच्या जीवनावर आधारित डॉ. बाळकृष्ण लळीत लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विजेत्या स्पर्धा काना रोख रक्कम, प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व गोवा येथील कवी, कवयित्री सहभागी झाल्या होत्या. परीक्षक म्हणून सुभाष गोवेकर, सौ. हर्षवर्धनी सरदार जाधव यांनी केले. सूत्रसंचालन भरत गावडे यांनी केले. तर आभार सुभाष गोवेकर यांनी मानले


Spread the love

Related posts

देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात पाच दिवसीय युवा महोत्सवाचे आयोजन.

news

शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी पुरस्काराने देवयानी आजगावकर सन्मानित….!

news

अमरनाथ यात्रेला १ जुलै २०२३ पासून होणार सुरुवात!

news

Leave a Comment