स्टोरी

NCMC कार्ड प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत “सक्षम स्त्री फाऊडेशन” चे लेखी निवेदन सादर.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) च्या तांत्रिक त्रुटींमुळे प्रवाशांना होणाऱ्या नाहक आर्थिक नुकसान होत आहे.तसेच ​, शहरातील ग्रामीण भागातील नागरिक, दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रवास करण्यासाठी NCMC (NCMC Card) चा वापर करत आहेत. शासनाच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत या कार्डाला प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या कार्डाच्या प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रवाशांकडे वैध NCMC कार्ड आणि त्यात पैसे असताना देखील बसमधील मशीनमध्ये (ETM) ‘एरर’ दाखवला जातो. परिणामी, कार्ड स्कॅन न झाल्याचे कारण सांगून प्रवाशांकडून रोख स्वरूपात पूर्ण (फुल) तिकीट वसूल केले जात आहे. प्रवाशांचे NCMC कार्ड ऑनलाईन किंवा अधिकृत केंद्रांवरून रिचार्ज करताना वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत, मशीन वर रिचार्ज होऊन व पैसे घेऊन देखील कार्ड ला पैसे येत नसल्याचे प्रकार होत आहेत. ज्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शाळा-कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, नोकरीनिमित्त प्रवास करणारे तरुण आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकडे रोख पैसे नसतात किंवा ऐन वेळी त्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो. यामुळे प्रवाशांसोबत वाहकांची अनावश्यक बाचाबाची होत आहे.​ तरी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन, NCMC कार्ड प्रणालीतील तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करण्यात यावा. तसेच, जोपर्यंत ही यंत्रणा सुरळीत चालत नाही, जोपर्यंत एसटी बसमधील सर्व मशिन्स आणि नेटवर्क यंत्रणा सुरळीत चालत नाहीत तोपर्यंत एनसीएमसी कार्डची सक्ती थांबवावी आणि तांत्रिक बिघाड तातडीने दूर करावा व कार्ड असल्यास महिलांना हाफ तिकीट च देण्यात यावे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना, विद्यार्थीनी, महिलांना या अडचणींमुळे होणाऱ्या आर्थिक भुर्दंडापासून दिलासा द्यावा, ही नम्र विनंती.​ या समस्येवर तातडीने योग्य ती कारवाई करण्यात यावी, ही अपेक्षा. चे निवेदन सक्षम स्त्री फाऊडेशन च्या अध्यक्ष तथा भाजपच्या नगरसेविका नीलम नाईक व आधीनी निवेदना द्वारे लक्ष वेधले


Spread the love

Related posts

स्वामी भक्तीतच समाधानी जीवनाचे राजमार्ग! शिक्षणमंत्री दीपक केसरकर 

news

मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळला..! ठेकेदार आणि प्रशासनाच्या निर्लज्जपणामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी.

news

मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्रंथालय संघाची सभा संपन्न.

news

Leave a Comment