सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ व कलंबिस्त ज्ञान मंदिर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘वाचाल तर वाचाल’ हा उपक्रम होणार आहे. याच वेळी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे. मराठी शाळा बचावच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.तरी सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक *श्री. शेडगे* आणि वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.
