स्टोरी

जि. प. शाळा केसरी येथे ३ ऑक्टोबर ‘अभिजात मराठी भाषा गौरव दिन’ उत्साही वातावरणात विविध उपक्रम घेऊन साजरा.

Spread the love

सावंतवाडी (प्रा.भरत गावडे): ३ ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा गौरव दिन उत्साही वातावरणात विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. समर्थ साटम महाराज वाचन मंदिर दाणोली व जि. प .शाळा केसरी त्यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन जि. प. शाळा केसरी या ठिकाणी करण्यात आले होते प्रास्ताविक मनोगतात साटम महाराज वाचन मंदिराचे अध्यक्ष भरत गावडे .यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली व त्यानंतर सहवाद्यांच्या सहित मराठी भाषा जनजागृती फेरी काढण्यात आली या फेरीमध्ये दाणोली केंद्राचे केंद्रप्रमुख जी .आर .निऊंगरे भरत गावडे ,मुख्याध्यापिका वृषाली पाटील, केसरी गावचे माजी उपसरपंच संदीप पाटील ,विद्यमान उपसरपंच भिवा सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी विलास जंगले , जि.प .शाळा शिक शाळेचे मुख्याध्यापक दत्ताराम सावंत, अंगणवाडी सेविका संचिता सावंत, सुचिता सावंत ,ग्रामस्थ सुमन सावंत ,अनुष्का सावंत, व ग्रंथपाल दीपा सुकी, पवन केसरकर सहभागी झाले होते .कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

यावेळी दाणोली केंद्राचे केंद्रप्रमुख जी.आर.निऊंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .ते म्हणाले इतर भाषांपेक्षा मराठी भाषेला वेगळे सौंदर्य आहे. अलंकार ,म्हणी,वृत्त यांनी भरलेली ही मराठी भाषा संतांच्या साहित्यानी भरलेलीआहे .म्हणून आज अभिजात भाषा गौरव दिन साजरा करताना आनंद होत आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाकडे लक्ष द्यावा व आपल्या भाषेवर प्रेम करावे असे मत व्यक्त केले प्रमुख वक्ते साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे मराठी भाषेचे महत्त्व सांगून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे .याकरिता ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले .त्यामध्ये माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना ३ ऑक्टोबर ३०२४ला केंद्र शासनाने आपल्या मायबोलीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन आपल्या साहित्य आणि संस्कृतीचा गौरव केला आहे .आज आपण दुसरा वर्धापन दिन केसरी सारख्या ग्रामीण भागामध्ये सर्वांच्या सहकार्याने साजरा करत आहोत त्याचा आनंद होतो .आहे .श्री गावडे यांनी मराठी भाषेची परंपरा विद्यार्थ्यांना सांगितलीआपण वाचन संस्कृती वाढवली तर मराठी भाषा अधिक विकसित होईल. आणि बोलीभाषेकडे विशेष लक्ष दिला तर मराठी भाषा अधिक विकसित होईल ,समृद्ध होईल नेहमी आपण बोलताना मराठीचाच वापर करावा .संवाद कौशल्य वाढवावीत .वाचू आनंदे यासारखे कार्यक्रम शाळेने हाती घ्यावे असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला समर्थ साटम महाराज वाचन मंदिराचे सहसचिव गजानन गावडे उपस्थित होते. त्यांनी मुलांना आपल्या काही प्रसंगाचे वर्णन केले प्राथमिक शिक्षण हे मराठी माध्यमातूनच झाले पाहिजेत .तरच विद्यार्थ्यांचा विकास चांगला होतो. आपली भाषा आपली संस्कृती आपल्या परंपरा हे आपल्याला अधिक कळतात त्यातून आपण सजग नागरिक होऊ शकतो .अशा भावना व्यक्त केल्या याप्रसंगी जि. प .शाळा केसरीच्या मुख्याध्यापिका वृषाली पाटील हिने भाषा समृद्धीबाबत आपले विचार व्यक्त केले जि. प .शाळा शितप वाडी चे मुख्याध्यापक दत्ताराम सावंत यांनी साहित्यिकांची माहिती सांगितली आपल्याला पटेल रुचेल असे साहित्य वाचावे व वाचन संस्कृती वाढवावी यावेळी लावण्या कुमारी.लक्ष्मण कोकरे .हर्षाली, प्रशांत सावंत .सुप्रिया वि शेळके या विद्यार्थ्याने मला आवडलेले पाठ्यपुस्तक व मला आवडलेले पुस्तक यावर भाष्य केले जि .प.शाळा केसरी या शाळेतील विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील कविता सादर करून कार्यक्रमाला शोभा आणली आम्ही दररोज १५ ते २० मिनिटं प्रकट वाचन करू असे प्रतिज्ञा केली .कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेतील शिक्षक सुनील जाधव.,समीक्षा नाईक ,प्रियदर्शनी जाधव, ग्रंथपाल दीपा सुकी, विलास जंगले यांनी केले होते दोन तास झालेल्या कार्यक्रमानंतर कार्यक्रमाच्या आधारे पाच प्रश्न विचारण्यात आले होते .या प्रश्नांची योग्य उत्तरे रामचंद्र संदेश सावंत, सुहानी पाटील ,मोहित तुकाराम सावंत ,रुंजी महेश कासले ,वेदिका विजय जंगले यांनी दिली त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व ग्रंथ भेट देऊन करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्यासपीठावरील सर्व व्यवस्था शालेय विद्यार्थ्यांन केली होती. सूत्रसंचालन सुहानी पाटील .व सोनाली पाटील यांनी केले आभार कुमारी हर्षाली सावंत यांनी मानले.


Spread the love

Related posts

गोळवण येथे १७ लाभार्थ्यांना गॅस शेगडी व सिलेंडर वाटप!

news

मसुरे येथे भरतेश्वर मंदिरात रामनवमी उत्सव साजरा..

news

तुळस गावात राज्याच्या बाहेरील लोकांचे वास्तव्य आणि संशयास्पद वागण्याकडे ग्रामपंचायत आणि प्रशासनाचे दुर्लक्ष…!

news

Leave a Comment