स्टोरी

वैश्यवाणी समाजाच्या ओबीसी प्रश्नावर महत्त्वपूर्ण यश.

Spread the love

सावंतवाडी: वैश्यवाणी समाजाच्या ओबीसी जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्यासाठी सन २००८ च्या शासन परिपत्रकाप्रमाणे निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाले आहे. या संदर्भात मंत्री अतुल भावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आमदार किरण सामंत साहेब आणि उद्योगमंत्री तथा कोकणचे नेते आमदार उदय सामंत साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामध्ये महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. वैश्यवाणी समाजाला ओबीसी जात प्रमाणपत्र व जात पडताळणी मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करून समाजाच्या न्याय्य मागणीला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक पावले उचलत आहे. वैश्यवाणी समाजाच्या हक्कासाठी केलेल्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल आमदार किरण सामंत साहेब व उद्योगमंत्री आमदार उदय सामंत साहेब यांचे वैश्य समाजाकडून मनःपूर्वक आभार मानले. बैठकीमध्ये आमदार प्रमोद जठार, सुनील भोगटे, अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज;, ॲड. समीर प्रमोद वंजारी, संचालक, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था; श्री. उमेश वाळके, कणकवली, संचालक, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था; रत्नागिरी जिल्हा वैश्य समाजाचे अध्यक्ष विकास शेटये तसेच श्री प्रशांत शेटये, विकास संसारे, भिंगार्डे आणि इतर समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी वैश्यवाणी समाजाच्या ओबीसी जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत आपली भूमिका आणि समाजाची बाजू ठामपणे व भक्कमपणे मांडली. समाजाच्या या महत्त्वपूर्ण प्रश्नावर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.“येत्या एक महिन्याच्या कालावधीत ‘हिंदू वैश्यवाणी’ आणि ‘वैश्यवाणी’ हे दोन्ही उल्लेख एकच असल्याचे स्पष्ट करून, त्यानुसार ओबीसी जात प्रमाणपत्र व जात पडताळणीची प्रक्रिया करण्यात येणार आहे.”


Spread the love

Related posts

मालवण केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत दांडी येथील सौ.निर्झरा जोशी प्रथम!

news

अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात नुतन वर्षाचे उत्साहाने स्वागत…! भक्तीमय धार्मिक कार्यक्रमांनी वर्ष अखेर गजबजले.             

news

सिंधुदुर्ग जिल्हातील शासकीय यंत्रणेच्या ढिम्म कारभाराबाबत जिल्हावासियांचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना साकडे

news

Leave a Comment