क्राईम

देवसु येथे पोलिसांची धडक कारवाई; चार बंदुका, काडतुसे आणि खवले मांजराचे खवले जप्त..! तीन संशयित ताब्यात;

Spread the love

सावंतवाडी ता. २५ : सावंतवाडी तालुक्यातील देवसु गावात पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी अचानक छापे टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत चार बंदुका, तीन जिवंत काडतुसे तसेच दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या खवले मांजराचे सुमारे एक किलो खवले जप्त करण्यात आले. या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने देवसु गावात पहाटेच्या सुमारास ही धडक कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या बंदुकांमध्ये काडतुसाच्या तसेच ठाचणीच्या बंदुकांचा समावेश आहे. बेकायदेशीर शस्त्रसाठ्याबरोबरच वन्यजीवांशी संबंधित साहित्य मिळाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि वन्यजीवांच्या अवयवांच्या तस्करीत सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही शोध सावंतवाडी पोलीस घेत आहेत. अचानक झालेल्या या कारवाईमुळे देवसु परिसरात खळबळ उडाली आहे.


Spread the love

Related posts

माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि साहाय्‍यक पोलीस निरीक्षक राहुल राऊत यांना ५ दिवस पोलीस कोठडी!

news

राजीव गांधी यांच्याप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांना मानवी बाँबने उडवून देऊ!धमकीचे पत्र

news

श्री मलंग पट्टयातील एका घरावर चोरट्यांनी डल्ला मारून अख्ये घर लुटले ! महेश गायकवाड यांनी त्वरीत दिला मदतीचा हात !

news

Leave a Comment