स्टोरी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा बेवारस तरुणाला आधार.

Spread the love

सावंतवाडी (रवी जाधव): सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही संस्था कुठचीही अपेक्षा न बाळगता निस्वार्थपणे शहरांमध्ये एक संजीवनी म्हणून काम करत आहे. संकटात दुःखात आणि वेदनेत असलेला माणूस तरला पाहिजे हे या संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. आज पर्यंत अनेक निराधारांना त्यांनी आधार दिला आहे. कालची घटना विठ्ठल मंदिरच्या समोर दोन्ही हात जमिनीला टेकून घष्टत चाललेला एक तरुण ज्याच्या दोन्ही पायांना मोठ्या जखमा होऊन त्या मध्ये किडे पडले होते. आणि खूप घाण वास येत होता. हे पाहून कोणीही त्या तरुणा जवळ जाण्याची हिंमत करत नव्हता. अशा वेळी सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोजा यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधून सदर वस्तुस्थिती सांगितली असता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, शेखर सुभेदार, रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम तेथे पोहोचले व संस्थेच्या रुग्णवाहिकेने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन गेले त्या ठिकाणी त्या शेखर सुभेदार व रवी जाधव यांनी त्याला चांगली आंघोळ घातली. तसेच पायामध्ये पडलेले किडे औषधाच्या साह्याने बाहेर काढले व लक्ष्मण कदम यांनी डॉक्टरांच्या मदतीने त्यांच्या जखमाला औषध लावून ड्रेसिंग केले व सदर तरुणाला अधिक उपचारासाठी संस्थेच्या रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालय ओरस येथे अधिक उपचारासाठी दाखल केले. मृत्यूची झुंजत असलेल्या तरुणाने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग मधील माकडांची होणार प्रगणना, सावंतवाडी वन विभागाकडून माकड उपाययोजनेचे पुढचे पाऊल…..!

news

मराठा आणि धनगर आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे !

news

कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

news

Leave a Comment