राजकारण

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार..! ३ खाती महाराष्ट्राच्या वाट्याला येणार.

Spread the love

दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातही काही फेरबदल किंवा नवीन मंत्र्यांचा समावेश होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. महत्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळत ३ खाती महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहेत. अशी. माहिती मिळत आहे. ठाकरेच्या शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या ६ खासदारांनीपैकी २ जणांना थेट मंत्रिपद मिळणार अशी सुत्रांकडून मिळाली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची पदोन्नती होणार असून नरेंद्र मोदी त्यांच्यावर मोठी नवीन जबाबदारी देऊ शकतात.

केंद्रिय मंत्री अमित शाह यांना उपपंतप्रधान पद मिळू शकते, अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिपद मिळवण्याकरिता मोठी लॉबिंगही सुरू आहे. त्यामध्येच केंद्रीय मंत्री अचानक भाजपा कार्यालयात दाखल झाल्याने विविध चर्चा सुरु आहेत. दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक घडामोडी घडत आहेत. गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्ली दाैऱ्यावर होते. खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय जाधव यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

द इंडियन एक्सप्रेसच्या सूत्रांच्या माहितीनुसार, दोन केंद्रीय मंत्री दिल्लीतील बीजेपी कार्यालयात पोहोचले होते. विशेष म्हणजे ते काही वेळातच कार्यालयातून बाहेर पडले. ज्यावेळी जोरदार चर्चा सुरू आहे की, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात या दोन्ही मंत्र्‍यांची सुट्टी होणार आहे. कारण ते कार्यालयात गेले आणि काही वेळातच बाहेर पडले.मंत्रिमंडळाच्या विस्तारात ज्या कॅबिनेट मंत्र्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे, त्याची यादी तयार आहे. मात्र, या चर्चांवर भाजपाकडून प्रतिक्रिया देण्यात आली.


Spread the love

Related posts

पब्लिक सबकुछ जानती है, म्हणत फडविसांचा विरोधकांवर हल्लाबोल…..

news

१० हजार तरुणांना जर्मनीत पाठविण्याचे आश्वासन देण्यापेक्षा राणेंनी आपल्या दोन्ही मुलांना जर्मनीमध्ये पाठवावे मग सिंधुदुर्गात रोजगार उपलब्ध होईल.

news

संजय राऊत पत्रकार आहेत का? नितेश राणेंचा प्रश्न…..

news

Leave a Comment