स्टोरी

आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आळंदी येथून ८ जुलै २०२६ रोजी प्रस्थान होणार..!

Spread the love

संपादिकीय ✍🏻: आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी) हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण आहे, जो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात, अशी धार्मिक मान्यता आहे. पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी वारी करत पोहोचतात पंढरपूरात चंद्रभागेच्या तीरावर महाजत्रा भरते.आषाढी वारी: वारकरी संप्रदायामध्ये या वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांच्या पालख्या विविध ठिकाणांवरून पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. या दिवशी विठ्ठल-रखुमाईची मनोभावे पूजा केली जाते. भाविक दिवसभर उपवास करतात आणि ‘रामकृष्ण हरी’ किंवा ‘विठ्ठल विठ्ठल’ असा नामजप करतात.महत्त्व: आषाढी एकादशीला ‘महाएकादशी’ किंवा ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. या एकादशीचे व्रत केल्याने वर्षभरातील इतर सर्व एकादश्यांचे पुण्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

आषाढी एकादशी यावर्षी २५ जुलै रोजी आहे. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत विठ्ठलाच्या भेटीला आतुरलेले लाखो वारकारी चालत वारीला जातात. यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आळंदी येथून प्रस्थान ८ जुलै २०२६ रोजी होणार आहे. पालखीचा पायी प्रवास २४ जुलै २०२६ रोजी पंढरपुरात पोहोचणार आहे. तर मुख्य आषाढी एकादशी सोहळा २५ जुलै २०२६ रोजी साजरा होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आळंदी येथून प्रस्थान ८ जुलै २०२६ रोजी होणार आहे. ८ जुलै आळंदीहून प्रस्थान झाल्यावर ९-१० जुलै रोजी पुणे येथे मुक्काम होणार आहे. ११-१२ जुलै रोजी सासवड येथे मुक्काम होणार आहे. १३ जुलै रोजी जेजुरी येथे मुक्काम होणार आहे. १४ जुलै रोजी वाल्हे येथे मुक्काम असेल. १५ जुलै लोणंद येथे, १६ जुलै रोजी तरडगाव, १७ जुलै रोजी फलटण, १८ जुलै बरड, १९ जुलै रोजी नातेपुते, २० जुलै रोजी माळशिरस, २१ जुलै रोजी वेळापूर, २२ जुलै रोजी भंडीशेगाव (बंधूभेट), २३ जुलै रोजी, वाखरी असा मुक्काम करत २४ जुलै रोजी पालखी पंढरपूरात दाखल होणार आहे.


Spread the love

Related posts

जिल्हातील वीज समस्यांमुळे सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना आक्रमक.

प्रसाद परब

आचरा येथील सरपंच मंगेश टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांचा ठाकरे गटात प्रवेश….

news

पनवेलकरांना लवकरच वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळणार! नवनिर्वाचित वाहतूक डीसीपी डॉ. राहुल खाडे यांच्याकडे मोठी अपेक्षा

प्रसाद परब

Leave a Comment