अमेरिका : अमेरिकेतील टेक्सास राज्यातील फ्रिस्को शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. सिटी हॉलसमोर एक व्यक्तीने भारतीय राष्ट्रध्वज फाडला आणि “Fuck India” असे नारे दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, जगभरातून भारतीयांच्या भावनांवर आघात करणारी ही कृती तीव्र संतापाला कारणीभूत ठरली आहे.व्हिडिओत दिसते की, एक व्यक्ती सिटी हॉलसमोर उभी राहून सिगारेट ओढत भारतीय ध्वज फाडत आहे, तर त्याच्या आसपासच्या काही लोकांनी टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन दिले. हा प्रकार भारतीय स्थलांतर आणि H-1B व्हिसा मुद्द्यावरून सुरू असलेल्या स्थानिक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडला असल्याचे सांगितले जात आहे.भारतीय राष्ट्रध्वज हा केवळ एक झंडा नसून, १४० कोटी भारतीयांच्या अभिमान, स्वातंत्र्य आणि एकतेचे प्रतीक आहे. त्याचा असा अपमान संपूर्ण भारतीय समाजाच्या भावनांवर आघात करणारा आहे. सोशल मीडियावर या घटनेची निंदा करणारे पोस्ट्स आणि संदेश मोठ्या संख्येने व्हायरल होत आहेत. अनेक भारतीय आणि भारतीय वंशाचे नागरिक याबाबत आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.ही घटना केवळ एका झंड्याचा अपमान नसून, विविधतेला आणि स्थलांतरित समुदायांना मान्यता देणाऱ्या अमेरिकन मूल्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. फ्रिस्को परिसरात गेल्या काही महिन्यांत भारतीय स्थलांतरितांबाबत वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.भारतीय सरकार आणि अमेरिकेतील भारतीय दूतावास याबाबत योग्य पावले उचलतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राष्ट्रध्वजाचा आदर हा आंतरराष्ट्रीय शिष्टाचाराचा मूलभूत भाग आहे आणि अशा कृत्यांमुळे सांस्कृतिक संबंधांवरही परिणाम होऊ शकतो.
भारतीय तिरंगा अपमानित करणे म्हणजे १४० कोटी भारतीयांच्या हृदयावर प्रहार करणे!
