क्राईम

ठाणे : हिरानंदानी इस्टेटमध्ये अवैध बारचा नंगानाच; फूटपाथवर दारू-ड्रग्जचा धुडगूस

Spread the love

ठाणे : उच्चभ्रू हिरानंदानी इस्टेटमधील ‘सोलस’ इमारतीच्या सार्वजनिक फूटपाथवर ‘रिकीज बार अँड किचन’ (Ricky’s Bar & Kitchen) च्या अनधिकृत कारभाराने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप निर्माण केला आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या बारमध्ये मद्य, हुक्का, वेप आणि ड्रग्जचा खुलेआम वापर होत असल्याचे आरोप आहेत. यामुळे अल्पवयीन मुला-मुलींना अंमली पदार्थांच्या जाळ्यात ओढले जात असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.बार मालक रिकी रमेश किसनानी आणि सनम रमेश किसनानी यांनी सार्वजनिक फूटपाथ ताब्यात घेऊन अनधिकृतपणे बार चालवल्याचा मुख्य आरोप आहे. येथे रात्रभर डीजे आणि मद्यपानाच्या पार्ट्या होत असल्याने रहिवाशांना चालणे मुश्किल झाले असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.स्थानिक नागरिकांचा दावा आहे की, कासर वडवली पोलीस स्टेशन आणि उत्पादन शुल्क विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. राजकीय आणि प्रशासकीय पाठिंब्याशिवाय एवढ्या मोठ्या स्तरावर कायद्याचे उल्लंघन शक्य नसल्याचीही खळबळजनक चर्चा रंगली आहे.या प्रकरणात BNS कलम १२६ (अवैध कब्जा), कलम २९२ (सार्वजनिक उपद्रव), JJ Act कलम ७७ (अल्पवयीनांना मद्य-ड्रग्ज पुरवणे) आणि कलम २८५ अंतर्गत तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.‘व्हॉईस ऑफ पीपल’ या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे ठाणेकरांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि उत्पादन शुल्क अधीक्षक प्रवीण सुनिल तांबे यांनी त्वरित लक्ष घालून बारचा परवाना रद्द करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाश आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

नागरिकांचा इशारा : “कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करू.”ही घटना ठाणे शहरातील कायद्याच्या अंमलबजावणी आणि उच्चभ्रू भागातील अवैध कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरली आहे.


Spread the love

Related posts

प्राणी कल्याण अधिकार्‍यांना मारहाण करणार्‍या गुन्हेगारांना पोलिसांकडून विशेष वागणूक !

news

मडगांव एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स चोरट्याने लांबवली.

news

सायबर गुन्ह्यापासून सावध रहा!वेंगुर्ला पोलिसांचा इशारा….

news

Leave a Comment