मसुरे प्रतिनिधी: मुंबई महानगरपालिका यांच्या विद्यमाने व आमदार श्री मिहिरजी कोटेचा पुरस्कृत आणि मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने मुंबई महापौर चषक शूटिंगबॉल स्पर्धा स्व. प्रमोद महाजन क्रीडांगण, भांडुप पश्चिम, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली होती, राज्यस्तरीय खुल्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील मुंबई, ठाणे, मालेगाव, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे येथील एकूण 18 संघानी सहभाग नोंदवला. अंतिम फेरीत आय एस सी मालेगाव संघाने मालेगावच्याच इस्तियाक संघावर २१–११ अशा फरकाने विजय संपादन केला. स्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या महापौर श्रीम. रितू तावडे यांच्या शुभहस्ते झाले.
त्याप्रसंगी ईशान्य मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष दीपक दळवी, प्रभाग समिती अध्यक्षा श्रीम. साक्षीताई दळवी, संजय शर्मा, रितेश सावंत, मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार शामभाई सावंत आणि सरचिटणीस दीपक सावंत आदी मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित होते. महापौर रितू तावडे यांनी संबोधित करताना सांगितले की गेल्या काही वर्षात महापौर चषक स्पर्धा होऊ शकल्या नाहीत, त्या आता सुरू झाल्या असून त्यात खंड पडणार नाही असे सांगून महापौर क्रीडा स्पर्धांचा निधी वाढवल्याचे जाहीर केले, त्यामुळे भविष्यात अधिक चांगल्या स्पर्धा घेता येईल असे सांगितले. राज्यस्तरीय स्पर्धा अंतिम निकाल पुढील प्रमाणे आहे.प्रथम आय एस सी, मालेगाव, व्दितीय इस्तियाक संघ, मालेगाव, तृतीय घोरपडे डेव्हलपर्स टेंभुर्णी, चतुर्थ सिलेक्टेड सेव्हन पुणे, पाचवा आरमार विक्रांत विक्रोळी, सहावा मुंबई पोर्ट ऑथोरिटी (एम बी पि टी) मुंबई, सातवा इक्बाल संघ मालेगाव,आठवा मुंबई महानगर पालिका संघ, बेस्ट शुटर वकार अंजुम मालेगाव,मालिका वीर इस्तियाक, मालेगाव, अष्टपैलू. दस्तगीर सिलेक्टेड सेवन पुणे, बेस्ट नेटमन इनज्माम, मालेगाव. मुंबई मर्यादित स्पर्धेत मुंबई स्पोर्ट्स अथॉरिटी (एम बी पी टी) संघाने अंतिम फेरीत राष्ट्रीय मिल मजदुर संघाचा (आर एम एम एस) या संघाचा अटीतटीच्या लढतीत २२–२० अशा अगदी कमी गुणांनी पराभव करून विजय मिळवला, विजयी संघातून भूषण मेस्त्री, अजित काकडे यांनी तर आर एक एम एस संघातून विकी सपकाळ, महेश कदम यांनी सुंदर खेळ केला. या अंतिम सामन्यासाठी पराग विद्या संकुल, भांडुप या शाळेचे संस्थापक, संचालक बाळकृष्ण बने शेठ हे उपस्थित होते.
स्पर्धेत रोख बक्षिसे, आकर्षक चषक देऊन आठ संघाना गौरविण्यात आले. स्पर्धा नियंत्रक म्हणून मिलिंद बिर्जे (सहसचिव), निरीक्षक प्रदीप वाघ (नाना), तांत्रिक निरीक्षक कुमार वाईरकर, स्पर्धा प्रशासक म्हणून मंगेश भोसले या पदाधिकाऱ्यांना विद्याधर जामसंडेकर, पांडुरंग सुतार, अशोक चव्हाण, दिलीप मालंडकर या सर्वांनी सहाय्य करीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. आयोजनसाठी भाजपा ईशान्य मुंबईचे पदाधिकारी, सर्वोदय नगर दक्षता समिती भांडुप मधील कार्यकर्ते प्रवीण सावंत, प्रसाद गावडे, प्रवीण कदम, शैलेश भुजबळराव यांचे मौलिक सहकार्य लाभले. क्रीडांगणव्यवस्था, आयोजन, निर्णयाधिकारी अशा महत्वपूर्ण विविधांगी भूमिका सक्षमपणे बजावणारे माजी शूटिंगबॉल खेळाडू पांडुरंग सुतार यांनी सांभाळली, त्यांचा शाल व स्मृतिचषक देऊन गौरविण्यात आले. निर्णयाधिकारी/पंच म्हणून विजय गोंधळी,(मुंबई) राजेश सोडल व अनिल सोनिकर (पुणे), अली फकीर (सांगली), यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.मुंबई मर्यादित स्पर्धा प्रथम. : मुंबई स्पोर्ट्स अथॉरिटी (एम बी पी टी) द्वितीय. : राष्ट्रीय मिल मजदुर संघ (आर एम एम एस) पारितोषिक वितरण समारंभ विभागीय आमदार अशोकजी पाटील, दीपकजी दळवी, संजयजी शर्मा, असोसिएशनचे अध्यक्ष मा.आमदार शामभाई सावंत, सरचिटणीस दीपक सावंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला .
