स्पोर्ट

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माणगाव प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थ्यांची बाजी  

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कोल्हापूर येथील प्रोऍक्टिव्ह अबॅकस लिमिटेड आयोजित प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशन जून २०२४ या स्पर्धेत माणगाव प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थिनीनी उज्वल यश संपादन केले. सहा मिनिटात १०० गणिते सोडविणे असे या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेचे स्वरूप होते.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात कमीत कमी वेळेत गणितीय बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, करत आपली बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी या स्पर्धा पद्धतीचा उपयोग होतो. या स्पर्धा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक जडणघडणीत मोलाची भर पडत आहे. या स्पर्धेत सुमारे २००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

    या स्पर्धेत प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या माणगाव सेंटर मधील शुभ्रा भिसे, दुर्वा भिसे, मैत्री धुरी, ज्ञानदा पिळणकर यानी उज्वल यश संपादक करीत ट्रॉफी पटकावली. या विद्यार्थ्यांना माणगाव प्रोऍक्टिव्ह अबॅकस संस्थेच्या संस्थापिका सौ मानसी मनोज खोचरे यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे डायरेक्टर गिरीश करडे, सौ सारिका करडे, अजय मणियार, ज्योती मणियार, तेजस्विनी सावंत यांनी अभिनंदन केले.


Spread the love

Related posts

सिंधू कन्या आणि मसुरे येथे आजोळ असलेली स्वानंदी संतोष सावंत हिला जूनियर राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक..

news

मुंबईत रंगणार २२ फेब्रुवारी पासून MPL चा थरार! श्री भगवती देवी प्रतिष्ठान मुणगे मुंबई यांचे आयोजन.

news

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची तब्बल १०७ पदकांची कमाई.

news

Leave a Comment