स्टोरी

हडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिराचा ४० जणांना लाभ

Spread the love

​मसुरे प्रतिनिधी: उतारवयात आरोग्य हीच खरी संपत्ती असते. वयोमानानुसार आपल्या शरीराच्या इतर तक्रारींसोबतच डोळ्यांचे विकारही वाढू लागतात. अनेकदा ‘म्हातारपणामुळे दिसत नाहीये’ असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण आजच्या प्रगत वैद्यकीय युगात मोतीबिंदू किंवा दृष्टीदोष यांवर मात करणे सहज शक्य आहे.असे प्रतिपादन हडी ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोहर हडकर यानी येथे केले.

कणकवली येथील विवेकानंद नेत्रालय आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, हडी (फेसकॉम संलग्न) यांच्या संयुक्त विद्यमाने हडी शाळा नं. २ (जठारवाडी) येथे भव्य ‘मोफत नेत्र तपासणी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. शिबिरामध्ये 40 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातील 12 जणांची मोतीबिंदू शस्त्रकीया तर 10 जणांना अल्प दरात चष्मा वाटप करण्यात येणार आहे.

आपल्या जेष्ठ नागरिक संघाचा मुख्य उद्देश फक्त एकत्र येऊन गप्पा मारणे हा नसून, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि समाजासाठी काहीतरी विधायक करणे हा आहे. आजचे हे शिबिर त्याच भावनेतून आयोजित केले आहे असे संघांचे अध्यक्ष देविदास सुर्वे म्हणाले. उपाध्यक्ष आरती कदम यानी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन करून करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर नेत्रालयाचे संदीप कदम, संघांचे अध्यक्ष देविदास सुर्वे, उपाध्यक्ष श्रीमती आरती कदम, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, सल्लागार चंद्रकांत पाटकर, गोविंद मुणगेकर, गुरुनाथ गावकर, नंदकुमार पाटील, प्रभाकर कांदळकर, श्री चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन आणि आभार चंद्रकांत पाटकर यानी मानले.


Spread the love

Related posts

महागाईवर मात करत सावंतवाडीत दीड दिवसांच्या गणपतींना भावपूर्ण निरोप; मोती तलावावर विसर्जनाचा उत्साह.

newss

पोलीस उपनिरीक्षक संतोष शिवापूरकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार!

प्रसाद परब

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावरील गोळीबाराच्या मागे सूत्रधार कोण?

news

Leave a Comment