स्टोरी

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ची सन २०६६ ची निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ची सन २०६६ ची निवडणूक मतदान काल मंगळवारी जवळपास सात केंद्रांवर शांततेत पार पाडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ठिकाणी केंद्र होती. सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ, ओरस, मालवण, देवगड, कणकवली येथील न्यायालयात वकील संघटनेच्या कक्षात मतदान प्रक्रिया झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रसिद्ध वकील बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे माजी अध्यक्ष ॲड संग्राम देसाई हे एकमेव उमेदवार रिंगणात आहेत. तर एकूण महाराष्ट्र व गोवा येथून १५९ उमेदवार यांचे भवितव्य आज ठरणार आहे. जवळपास दोन लाख ७० हजार एवढे मतदार संख्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२०० वकीलमतदार आहेत. मंगळवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण २५ जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यापैकी २३ सदस्य निवडून द्यायचे आहेत दोन सदस्य हे महाराष्ट्र व गोवा महा अधिवक्ता चे पदसिद्ध सदस्य म्हणून काम पाहतील तर २३ सदस्यांसाठी १५९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी १८ पुरुष व ५ महिला असे सदस्य साठी मतदान होणार आहे.

मतदान प्रणाली पसंती क्रमांका नुसार मतदानासह एकलहस्तांतरणीय मत असणार आहे. किमान पाच पसंती क्रमांक चिन्हांकित करणे आवश्यक आहे पाच पेक्षा कमी पसंती क्रम चिन्हांकित केल्यास मतपत्रिका अवैध्य ठरणार आहे. पहिल्या पसंतीचे मत सर्वात महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग वैभववाडी या दोन ठिकाणी मतदान केंद्र नसून जिल्ह्यात सात ठिकाणी मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड परिमल नाईक व ॲड उमेश सावंत यांनी सर्वत्र शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात मतदान प्रक्रिया होत आहे. असे स्पष्ट केले.

आतापर्यंत जवळपास ८० टक्के मतदान झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव उमेदवार ॲड संग्राम देसाई आहेत. सावंतवाडी न्यायालयात मंगळवारी मतदानाची प्रक्रिया सकाळपासून सुरू होती.सर्व वकील बांधव मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली होती. कुडाळ, कणकवली, देवगड, मालवण, वेंगुर्ले, ओरस या ठिकाणी दुपारच्या सत्रात गर्दी पाहायला मिळत होती. प्रसिद्ध वकील एडवोकेट संग्राम देसाई यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर जिल्हा अध्यक्ष एडवोकेट परिमल नाईक यांनीही सावंतवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. कणकवली येथे एडवोकेट उमेश सावंत सह ज्येष्ठ वकीलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सावंतवाडी वकील संघटनेमध्ये महिला वकिलांची संख्या अधिक दिसत होती.,


Spread the love

Related posts

सामंत ट्रस्ट तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान…!

news

कु. सिद्धेश घाडी यांचा प्रामाणिकपणा..! माजगावचा सिद्धेश आरपीडी कॉलेजचा विद्यार्थी.

news

बीज अंकुरे अंकूरे… ओल्या मातीच्या कुशीत..!

news

Leave a Comment