क्राईम

२३ वर्षीय तरुणीवर ५८ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप…!

Spread the love

छत्रपती संभाजीनगर: मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या २३ वर्षीय तरुणीवर संभाजीनगरमधील क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गेली होती. एका ५८ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने मदतीचा बहाणा करून तरुणीचा विश्वास संपादन करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात संबंधित अधिकारी, त्याची पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ मार्च २०२५ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात खासगी नोकरी करणारी २३ वर्षीय तरुणी ७ मार्च २०२५ रोजी मोबाइल हरवल्याची तक्रार देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गेली होती. त्यावेळी तिची ओळख पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण याच्याशी झाली. पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण यांनी लग्नाचे खोटे आमिष दाखवून लैंगिक तरुणीवर अत्याचार केले. तसेच बनावट मंगळसूत्र बांधून ती आपली पत्नी असल्याचे भासवले. ७ मार्च २०२५ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पीडितेची इच्छा नसताना तिचे तीनवेळा गर्भपात घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे. पिडीत तरुणीने जेव्हा लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपीने तिला जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपीची पत्नी नर्मदा चव्हाण आणि मुलगा सागर चव्हाण यांनीही पीडितेला मारहाण करून धमकावले असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तक्रार बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंद आहे.

मात्र स्वतःच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तारुणीने हा सफळा रचला होता असा संशय हि व्यक्त होत आहे. कारण साहजिकच २३ वर्षीय तरुणी ५८ वर्ष्याच्या व्यक्तीच्या प्रेमात कशी पडते? त्याचप्रमाणे त्या तारुणीने यापूर्वीच तक्रार का नोंद केली नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या पोलीस या गंभीर प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Spread the love

Related posts

आसाममध्ये ‘पी.एफ्.आय.’ या प्रतिबंधित संघटनेच्या ३ सदस्यांना अटक!

news

नगरपरिषदेच्या पाळणेकोंड धरण येथील साडेपाच लाख रुपयांच्या पाईपांची चोरी.

news

पेण येथे लक्‍झरीमधील प्रवाशांना मारहाण करत १५ तोळे सोने लुटले मुंबई-गोवा महामार्ग असुरक्षित !

news

Leave a Comment