स्टोरी

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे २३ मार्च रोजी साडेतीन शक्तीपीठ दर्शन सोहळा! प.पु. जगतगुरु शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर यांची प्रमुख उपस्थिती.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे२३ मार्च २०२३ रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन तसेच स्वामी समर्थ मठाच्या चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्वामी मठाचे संस्थापक सचिव अक्कलकोटभूषण श्री नंदकुमार तु. पेडणेकर यांच्या संकल्पनेतून स्वामी मठात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील सत्वयुक्त देवीची दोन दिवस स्थापना तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या नूतन चरण पादुकांची प्रतिष्ठापना प.पु. जगतगुरु शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते होणार आहे. यानिमित्त २२ ते २४ मार्च या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ मार्च २०२३सायं. ४.०० वा. पालखी सोहळा श्री देवी पावणादेवी मंदिर ते शिरगाव, निमतवाडी हडपीड पावणादेवी मंदिर ते श्री स्वामी समर्थ मठापर्यंत, सायं ८.०० वा. महाराष्ट्राच्या साडेतीन देवी शक्तिपीठांचे स्वामी समर्थ मठात आगमन.गुरुवार २३ मार्च २०२३सकाळी ५.०० वा.गणेश पूजन, पादुका पूजन,सकाळी ७.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ९ वाजताप.प. जगतगुरु शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या नूतन चरण पादुकांची प्रतिष्ठापना तसेच साडेतीन शक्तिपीठांच्या सात्विक महादेवींची दोन दिवसीय स्थापना. सकाळी १०.०० वा. लघुरुद्र,दुपारी १२.०० वा. पालखी सोहळा,दुपारी १२.३० वा. महाआरती, दुपारी १.३० वा.महाप्रसाद,दुपारी ३.०० वा.श्री प्रशांत पाटीदेकर यांचा सुस्वर गीतांचा कार्यक्रम, सायंकाळी ६.०० वा.देवींचा आविष्कारसखी परिवार (कोकण कट्टा), रात्रौ ८.०० वा.महाराष्ट्राची लोकधारा इंद्रायणी ग्रुप- सावंतवाडी.शुक्रवार २४ मार्च २०२३सकाळी ८.०० वा. देवींची पूजा, सकाळी १०.०० वा. कुंकुमार्चन, दुपारी १२.०० वा. महाआरती, दुपारी ९.०० वा. महाप्रसाद, दुपारी ३.०० वा. प्रा. डॉ. यशवंतराव पाटील (सर) नाशिक यांचे व्याख्यान, सायं. ५ वा. नामस्मरण, सायं ६ वा. गोंधळ आणि इतर भक्तीचे कार्यक्रम होणार आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या नूतन चरण पादुका अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील गाभाऱ्यात समर्थांच्या सत्यधारणेसाठी निवासी ठेवण्यासाठी विशेष सहकार्य वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष श्री. महेश इंगळे यांनी केले. तसेच समाधी मठात स्वामीच्या दिव्य समाधीवर या पादुकांवर सत्त्वांकित अभिषेक करण्यासाठी श्री अनु गुरुजींनी मोलाचे सहकार्य केले.हा शक्तिपीठ दर्शन सोहळा संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई- जोगेश्वरी मंडळ, हडपीड स्वामी मठ गाव समिती आणि कोकण कट्टा विलेपार्ले यांच्या सहकार्याने होणार आहे. सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष श्री. प्रभाकर राणे, सचिव श्री. नंदकुमार पेडणेकर, खजिनदार ज्ञानेश्वर राऊत यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आज सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांच्या महासंमेलनाला उपस्थित राहणार.

news

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टच्यावतीने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

news

सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदी गजानन नाटेकर यांची निवड…!

news

Leave a Comment