स्टोरी

माणगांव वाचनालयाचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: बुधवार दिनांक २ एप्रिल रोजी माणगांव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयचा वार्षिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दरवर्षी वाचनालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये पाठांतर, वक्तृत्व, रंगभरण, कथाकथन, अभिनय, हस्ताक्षर, बुध्यांक चाचणी यासारख्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि चषक देवून सत्कार करण्यात येतो.

या कार्यक्रमाला श्री प्रकाश तामणेकर, निवृत्त केंद्र प्रमुख राजापूर तसेच सौ राजश्री तामणेकर, निवृत्त मुख्याध्यापिका राजापूर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वाचनालयाच्या अध्यक्षा स्नेहा फणसळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी श्री. प्रकाश तामणेकर यांनी वाचनालयाच्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करत सर्व यशस्वी विद्यार्थी, वाचनालयाचे कार्यकारी मंडळ आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच पपू टेंबे स्वामींचे नावाने चालणाऱ्या या वाचनालयावर सदैव स्वामींची कृपादृष्टी आहेच असे विचार व्यक्त केले. तर राजश्री तामणेकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी तामणेकर यांनी वाचनालयाला रोख पाच हजार रुपयांची देणगी दिली. वाचनालायचे उपाध्यक्ष श्री. सदाशिव पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, अंतर्गत हिशेब तपासणीस श्री शरद कोरगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर आभार आणि सूत्रसंचालन विद्यमान संचालक तसेच माजी अध्यक्ष श्री. परशुराम चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठीसंचालक मंडळ तसेच ग्रंथपाल प्रज्ञा कविटकर, सहाय्यक ग्रंथपाल अजित आर्डेकर, लिपिक अनुष्का आर्डेकर आणि शिपाई अमोल केसरकर यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी संचालक मेघःशाम पावसकर, विजय केसरकर, स्नेहा माणगांवकर तसेच निवृत्त शिक्षिका अपूर्वा चव्हाण, सौ. सुधा कोरगावकर, आराध्या भिसे उपस्थित होते.


Spread the love

Related posts

जासई हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती निमित्त पालखी सोहळा संपन्न.

news

आग्रा किल्ल्यावर साजरी होणार शिवजंयती; पुरातत्व खात्याने दिली परवानगी…

news

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. नितीन ठाकरे यांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती

प्रसाद परब

Leave a Comment