स्टोरी

जागतिक महिला दिनानिमित्त देऊळवाडा येथे विविध कार्यक्रमांचेआयोजन

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: पुढारी जागतिक महिला दिनानिमित्त देऊळवाडा, वेताळ मंदीर नाडाळा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पू.प्रा.शाळेपासून माऊली मंदिर,भरतेश्वर मंदिर ते वेतोबा मंदिर पर्यत प्रभात फेरी काढण्यात आली.सकाळी काढलेल्या या फेरीत शालेय विद्यार्थी,महिलां तसेच देऊळवाडा ग्रामपंचायत सरपंच,सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.सर्वाना अल्पोपहार देत लगेजच कार्यक्रमाचे उद्घाटन मा. रजनीताई जोशी यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आल. यावेळी महिला पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष सौ.दीपश्री खाडीलकर,सौ तृप्ती तोरस्कर, प्रिया कोचरेकर, श्रीमती मनाली फाटक, प्रमुख अतिथी मान.फातिमा सिस्टर, देऊळवाडा, ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र सावंत, ग्रामसेवक सुनिल मलगावकर, ग्राम पंचायत सदस्य अशोक मसुरकर, चंद्रकांत राणे, मीनल तांबे, सौ.मनीषा बागवे सौ. साधना चौगुले, कार्यक्रमाच्या संयोजिका सौ.वर्षाराणी अभ्यंकर, तसेच प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रशांत पारकर सर,सचिन डोळस,सापळे मॅडम,स्वाती डोळस, श्री.महेश बागवे,महिला प्रतिनिधी सौ.जयमाला भोगले, मनाली फाटक. आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.तसेच अध्यक्षीय भाषण व आपल्या मनोगतात जोशी यांनी “शेती व रोजगाराच्या वाटा व संधी” यावर उपस्थितांशी संवाद साधला…त्यानंतर “आरोग्य विषयक मार्गदर्शन” करताना महिला पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या योग शिक्षक खाडीलकर,तोरस्कर,कोचरेकर यांनी शारीरिक व्याधीनुसार सर्वाना उपयुक्त योगप्रकार, प्राणायम यांचे प्रात्यक्षिक दाखवत उत्तम असे मार्गदर्शन केले.दुपारच्या सत्रात उत्तम भोजनाचा आस्वाद घेतल्यावर सत्रातील पुढील कार्यक्रमात शालेय विद्यार्थी (छोटा गट) व महिला मोठा गट यांनी अनेक रेकॉर्ड डान्स सादर करत कार्यक्रमात रंगत आणली…त्यानंतर सादर झालेल्या गितगायन कार्यक्रमात ग्रामस्थ महिलांनी भक्तिगीते, भावगीते, नाट्यसंगीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी जिजाऊ व महिला दिनावर उस्फुर्तपणे भाष्य करत सर्वांची वाहव्वा मिळवली.तसेच संध्याकाळी “होममिनिस्टर”हा कार्यक्रम झाला.हा कार्यक्रम पुण्याच्या सौ.वैशाली गायकवाड, सौ.सुजाता गायकवाड या ताईंनी घेतला…यामध्ये छोट्या मोठया खेळांसमवेत कॅटवॉक,फॅशनशो ची मजा महिला,युवती यांनी मनमुरादपणे लुटली..एकंदरीतच महिला दिनाचा कार्यक्रम अप्रतिम झाला..या संपूर्ण महिला दिनाच्या कार्यक्रमात गीतेश्री मसुरकर, संपदा बागवे,प्रज्ञा बागवे,सिमरन बागवे,समीक्षा बागवे,सानिका बागवे .सौ.अर्चना कोदे, छाया बागवे, मनीषा बागवे,अश्विनी परब,राजश्री घाडीगावकर, रंजना मुळ्ये, सुनीता परब, जयमाला भोगले, नम्रता बागवे,प्रमिला बागवे, रंजना बागवे, तन्वी लाड, आदींनी संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळली. सूत्रसंचालन सौ. वर्षाराणी अभ्यंकर,प्रज्ञा परब,विद्या लाकम यांनी केले.तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सौ. वर्षाराणी बलवंत अभ्यंकर यांनी केले..या देऊळवाडा मसुरे गावात महिला दिनाचे हे चौथे वर्ष.हे साजरे करण्यामागे ग्रामस्थ महिलांना एक दिवस तरी स्वतःसाठी वेळ देत रोजच्या प्रचंड मेहनतीच्या शेतीवाडीच्या कामातून मुक्त होत अशा कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटता यावा, त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्यातील गुणकौशल्याना वाव मिळावा, त्या आत्मनिर्भर व्हाव्यात…व त्यांना स्वतःची ओळख सापडावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे असे सांगताना कार्यक्रमाच्या संयोजिका सौ.वर्षाराणी अभ्यंकर भावुक झाल्या…व त्या साठीच या कार्यक्रमानिमित्त वर्षानुवर्ष नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबविणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. अशीच साथ देण्याचे आश्वासन वरील सर्व ग्रामस्थ भगिनींना दिले. यावेळी मारिया लोबो व येसुख्रिस्त ग्रुप,दीपाली बागवे, वर्षा परब,ज्योती परब,सुरेखा परब,रुक्मिणी परब,प्रिया बागवे आदी. उपस्थीत होते.एकूणच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महिला दिनाचा कार्यक्रम दर्जेदार झाला.क्यापशन: १)देऊळवाडा येथील महिला दिनाचे प्रभात फेरीरीत सहभागी महिला पुरुष २) देऊळवाडा येथील महिलादिन कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना रजनीताई जोशी सोबत वर्षाराणी अभ्यंकर, नरेंद्र सावंत, चंद्रकांत राणे, दिपश्री खाडिलकर, तृप्ती तोरसकर, आदी मान्यवरछाया : संतोष अपराज


Spread the love

Related posts

वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी

news

बनावट दस्तऐवज बनवुन फसवणुक केल्याबाबत आरोपीस जामीन मंजुर.

news

‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल आणि नवा इतिहास घडवेल.! – प्रा. रूपेश पाटील.

news

Leave a Comment