स्टोरी

सावंतवाडी मोती तलाव मध्ये असंख्य मासे मरत असल्यामुळे परिसरात पसरली दुर्गंधी…!

Spread the love

सावंतवाडी: गेले चार-पाच दिवसापासून मोतीतलामध्ये माशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मोती तलावातील पाण्यामध्ये हिरवा तवंग आल्यामुळे पाणी पूर्णपणे खराब झाले आहे आणि या कारणामुळे तलावतील मस्यांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा मिळत नसल्यामुळे मासे मृत्यू मुखी पडले आहेत,  असा प्रथम अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे सावंतवाडीतील नागरिकांना आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे सावंतवाडी प्रशासनाचा दुर्लक्ष आहे काय? असा प्रश्न ही उपस्थित होत आहे. त्यामुळे सावंतवाडी नगरपरिषदेने तलावामध्ये दिवसातून दोनदा तरी बोट फिरवून पाण्यावरचा तवंग कमी करण्याचे प्रयत्न करावा अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून होत आहे.


Spread the love

Related posts

ओसरगाव शाळेत व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य कार्यशाळा संपन्न!

प्रसाद परब

आफ्रिकेत इबोला विषाणूचे थैमान..! ९० जणांचा मृत्यू.

प्रसाद परब

कलंबिस्त येथील श्री देवी सावंत माऊली मंदिर पुन प्राणप्रति स्थापनेनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन.

news

Leave a Comment